नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नंदुरबारमधील विविध विकासकामांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी जोरदार भाषण करत उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. यावेळी नंदुरबार, नगरपरिषदेच्या नुतन इमारतीसाठी राज्य शासनाकडून येणे बाकी आहे, अशी तक्रार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली. त्यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) भर कार्यक्रमातूनच मंत्रालयात फोन करून ७ कोटींचा निधी मंजूर करून दिला.
मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने सभागृहात एकच जल्लोष झाला. तात्काळ आदेश काढल्याने सभागृहात शिंदे सरकारच्या नावाची घोषणाबाजी झाली. 'माझ्या खिशाला पेन असतो, आपलं चालतं फिरतं मंत्रालय आहे" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगत असतात. त्याचीच प्रचिती आज नंदुरबारकरांना आली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून सकाळी 11 वाजता नंदुरबार (Nandurbar) नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं.
तब्बल 22 कोटी रुपये खर्च करून नंदुरबार नगर परिषदेची भव्य इमारत तयार करण्यात आली असून या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री विजय कुमार गावित, खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषण सुरू होतं. चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. विलासराव आलेले असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी 3 दिवसात मंजूर केला असे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरुनच अधिकाऱ्यांना फोन लावून 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.