chhagan bhujbal
chhagan bhujbal saam tv

'दाऊदसारख्या कित्येकांना...'; नेत्यांची सुरक्षा काढण्यावरून भुजबळांचा शिंदे सरकारला इशारा

शिंदे सरकारने नुकतंच महाविकास आघाडीच्या १५ पेक्षा अधिक नेत्यांची सुरक्षा काढली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Published on

तबरेज शेख

Chhagan Bhujbal News : शिंदे-फडणवीस सरकारवर विराजमान होताच अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. शिंदे सरकारने नुकतंच महाविकास आघाडीच्या १५ पेक्षा अधिक नेत्यांची सुरक्षा काढली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

chhagan bhujbal
लग्न न करता आई झालीस तरी मला प्रॉब्लेम नाही, नात नव्याला असं का म्हणाल्या जया बच्चन?

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, 'सुरक्षा काढली या बाबत काहीही बोलणार नाही, आरोप करणार नाही. मी गृहमंत्री असताना माझ्यावर हल्ला झाला. मला किती अडचणी आल्या. दाऊद वगैरे कित्येकांना अंगावर घेतलंय. ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली, त्या बाबत पुनर्विचार करावा'.

'राज्यातील प्रकल्प गुजरातला (Gujrat) जातात या बाबत दुर्दैव आहे. टाटांना प्रकल्पाबाबत टक्केवारी मागितल्याचा आरोप आहरे. टाटांचे काम एकदम चोख असतं. मी मुंबईमध्ये असताना त्यांची माझी चांगली ओळख होती', असे भुजबळ पुढे म्हणाले.

'कारखाना १ वर्ष येण्यापूर्वी मी पत्र सुभाष देसाईंना पाठवले. मी पत्र पाठवले त्याचे कारण की, लढाऊ विमानांचा कारखाना नाशिकमध्ये व्हावा. तो कारखाना नागपूरला हवा. जे अचानक झालं त्याबाबत बोलण्यापेक्षा सर्वांना एकत्रित त्यावर विचार विनिमय करून विनंती करावी. कारखाने इथे चालू झाल्याने रोजगार वाढेल. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दोष देणार नाही. कारण त्यांची शक्ती कमी पडते', असा निशाणा भुजबळांनी शिंदे सरकारवर साधला.

chhagan bhujbal
Eknath Shinde : भर कार्यक्रमातूनच CM शिंदेंनी फिरवला फोन, तात्काळ ८ कोटी मंजूर, नंदुरबारमध्ये नेमकं काय घडलं?

नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीवर भुजबळ म्हणाले की, 'नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढू नये कारण सर्वांचा शहराकडे बघण्याचा दृष्टीकोण चांगला आहे. यामध्ये फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे. नवीन पोलीस आयुक्त अधीक्षक हे आताच आले आहेत. त्यांना थोडा वेळ द्यावा. काम करण्यासाठी त्यामुळे ते यावर नक्कीच आवर घालतील'.

'नाशिकमध्ये पोलिसांचे संख्या बळ कमी असल्याने देखील असे होत असेल. पोलिसांना वाहने नाही. जुने एसपी होते. त्यांनी त्या गाड्या ठेऊन घेतल्या. सरकार बदलले आणि एसपी त्या गाड्या जाताना घेऊन गेले आणि खटारा गाड्या ठेऊन गेले, असा आरोप भुजबळांनी 'एसपी'वर केला आहे. ज्यांना सुरक्षेची खरी गरज आहे, त्यांनी नक्की सुरक्षा द्यावी, नाही तर देऊ नये, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com