Rukminibai Hospital: प्रसूती प्रकरणानंतर केडीएमसी आरोग्य खात्याविरोधात मनसे आक्रमक; दोन्ही महिला अधिकारी गायब

Rukminibai Hospital: केडीएमसी रुग्णालयाच्या दारात महिलेची प्रसूती प्रकरण चांगलेच तापलंय आहे.
Rukminibai Hospital:
Rukminibai Hospital:saam Tv
Published On

MNS protest on KDMC Hospital:

महापालिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर महिला प्रसूती प्रकरणात मनसे आक्रमक झालीये. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसेचे महिला पदाधिकारी कार्यकर्ते अश्विनी पाटील, प्रतिभा पानपाटील यांचा सत्कार देत ट्रॉफी देण्यासाठी आरोग्य विभागात दाखल झाल्या. दरम्यान या प्रकरणातील या दोन्ही महिला अधिकारी गायब झाल्या होत्या. (Latest News on State)

मनसे कार्यकर्त्यांना रुग्णालयात जाण्यास मज्जाव केल्याने संतापलेल्या महिला कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरोग्य विभागाचा गेट ओढणीने बंद केला आणि ट्रॉफी, पुष्पगुच्छ आणि पत्र गेटवर बांधून तीव्र निषेध व्यक्त केला. मनसेच्या या आंदोलनानंतर महापालिका सुरक्षा रक्षक आणि पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

केडीएमसी रुग्णालयाच्या दारात महिलेची प्रसूती प्रकरण चांगलेच तापले आहे. केडीएमसीच्या विरोधात नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. सोमवारी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी उर्मिला तांबे, शितल विखणकर, उदय वाघमारे, कपील पवार यांचासह मनसे सैनिक हातात पुष्पगुच्छ, ट्रॉफी घेऊन घोषणाबाजी करीत केडीएमसी मुख्यालयाच्या आरोग्य खात्यात दाखल झाले.

दोन्ही अधिकारी कार्यालयात नसल्याचे सांगत सुरक्षा रक्षकांनी मनसे कार्यकर्त्यांना गेटवर रोखून धरले. मात्र मनसे कार्यकर्ते या दोघींचा सत्कार करण्यावर ठाम होते. अखेरपर्यंत या महिला अधिकारी समोर आल्या नाहीत. तेव्हा संतप्त महिलांनी आरोग्य विभागाचे प्रवेशद्वार ओढणीने गच्च बांधून एकाही कर्मचारी अधिकाऱ्याला कार्यालयाच्या बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा दिला.

दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेची प्रसूती झाल्याच्या प्रकरणानंतरही केडीएमसी आरोग्य विभागाचा गलथान कारभार सुरू असल्याचं दिसत आहे. कल्याण जवळील टिटवाळामधील केडीएमसीच्या रुग्णालयातील ओपीडी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. चार लाख लोकसंख्या असलेल्या टिटवाळ्यातील पालिका रुग्णलयाची ओपीडी बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Rukminibai Hospital:
Thane Cancer Hospital: डोंबिवलीत लवकरच अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभारणार, कसं असेल, काय असतील सुविधा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com