Maharashtra Rain Alert: छत्र्या-रेनकोट बाहेर काढा! मुंबईसह या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

Rain Alert in Maharashtra: येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain AlertSaam TV
Published On

Maharashtra Rain Updates: मान्सूनपूर्व पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाऊस पडला तरी, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे देशासह राज्यातील वातावरणात मोठे बदल होत आहेत. कधी उन्हाच्या झळा तर कधी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळं या दोन्ही राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार (Heavy Rain) पाऊस सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

Maharashtra Rain Alert
Shocking News: धुमधडाक्यात लग्न लागलं, नववधू माहेरी गेली अन् परतलीच नाही; सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले

याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका (Heat Wave) वाढला असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. काल परवा मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर उर्वरीत महाराष्ट्राच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

मात्र आता पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

Maharashtra Rain Alert
Maharashtra Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई (Mumbai Rain), ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये शनिवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, तर काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात कधी येणार?

चक्रीवादळामुळे मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 23 जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, दक्षिण आणि ईशान्य भारतात 18 ते 21 जून दरम्यान पावसाच्या (Rain) सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com