Pune Rain Flood : पिंपरी-चिंचवडमध्ये कोसळधारा, अनेक ठिकाणी पूरस्थिती, ६०० हून अधिक कुटुंबीय स्थलांतरित

Flood Alert Pimpri Chinchwad: पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. आतापर्यंत सहाशेहून अधिक कुटुंबीयांना महापालिकेने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले.
Flood Alert Pimpri Chinchwad
Flood Alert Pimpri ChinchwadSaam Tv
Published On
Summary
  • पवना धरण 100% भरल्याने १५,५७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

  • पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठील परिसरात पूरस्थिती निर्माण

  • सहाशेहून अधिक कुटुंबीयांचे महापालिकेकडून स्थलांतर

  • पूरग्रस्त भागात क्यूआरटी व एनडीआरएफ पथके तैनात, प्रशासन अलर्टवर

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून नद्या आणि नाल्यांमध्ये पाणी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठी असलेल्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने या भागातील शेकडो कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून धरण प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सुमारे १५,५७० क्युसेक्स पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. यामुळे पवना नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून नदीकाठच्या वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे. वाल्हेकर वाडी, चिंचवडगाव, भाट नगर, संजय गांधी नगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आणि पवनानगर या भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Flood Alert Pimpri Chinchwad
Pune News: पुणेकरांना सर्दी, खोकल्‍यानं वाढला 'ताप', साथीच्या आजाराचे रूग्ण वाढले, काय घ्याल काळजी?

महापालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास 600 हून अधिक कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागांमध्ये क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम) पथक तैनात करण्यात आले असून नागरिकांना आवश्यक ती मदत केली जात आहे. स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांसाठी अन्नपाणी, वैद्यकीय सेवा आणि आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. अनेक नागरिकांनी घरामध्ये पाणी शिरल्याने आपला संसारसामान गमावला असून त्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

Flood Alert Pimpri Chinchwad
Pune Monsoon Tourism Places : मुसळधार पावसात फिरण्यासाठी पुण्यातील खास ठिकाणं; एकदा भेट द्याल तर भारावून जाल

इंद्रायणी नदीचा जलस्तरही धोक्याच्या पातळीच्या वर गेला असून चिंचवड, आकुर्डी व निगडी परिसरातील नागरिक सतर्कतेवर आहेत. मुळा नदीकाठील रहिवाशांनाही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. पाणी साचल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. काही ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विशेषतः मुंबई-पुणे महामार्गालगतच्या काही भागांमध्ये वाहतूक कासवगतीने सुरू आहे.

Flood Alert Pimpri Chinchwad
Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

तसेच पिंपरी चिंचवड शहराच ग्राम दैवत असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरात पवना नदीचं पाणी शिरलं आहे. मंदिराचा जवळपास ५० % इतका भाग पाण्याखाली गेला आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोरया मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे.

महापौर, महापालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफची पथकेही पिंपरी-चिंचवड परिसरात सतर्क ठेवण्यात आली आहेत. पुढील २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नदीकाठील नागरिकांना तात्काळ सावधगिरी बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे.

Flood Alert Pimpri Chinchwad
Pune Monsoon update: पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी; पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, पाहा व्हिडिओ

या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, अनेक कारखान्यांतील कामगारांनी सुरक्षिततेसाठी कामावर जाणे टाळले आहे. पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रंदिवस कार्यरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com