राज्याची हरित ऊर्जा क्षेत्रात नवी भरारी; ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार

अदानी (Adani) उद्योग समुहातर्फे ही वीज निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा हा महत्वाचा निर्णय राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत (Nitin Raut) यांनी घेतला आहे.
Energy department
Energy department saam tv
Published On

भूषण शिंदे

मुंबई : येत्या ५ वर्षात राज्यात तब्बल ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. अदानी (Adani) उद्योग समुहातर्फे ही वीज निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा हा महत्वाचा निर्णय राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत (Nitin Raut) यांनी घेतला आहे. (Nitin Raut Latest News In Marathi )

Energy department
अब्दुल सत्तारांचं हिंदुत्व धोक्यात आलं, याचं मला आश्चर्य वाटलं : संजय राऊत

जागतिक आर्थिक परिषदेत ५० हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणणारे ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी यानंतर अवघ्या महिनाभरात पुन्हा ६० हजार कोटींची गुंतवणूक क्षेत्रात आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात १ लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्य सरकारचा ऊर्जा विभाग आणि अदानी ग्रीन एनर्जी समूह (एजीईएल) यांच्यात आज ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार करण्यात आला.अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात व हरित ऊर्जा क्षेत्रात नवी उंच भरारी घेणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी या करारानंतर बोलताना व्यक्त केली.

या करारानुसार अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतर्फे राज्यात पम्पड स्टोरेज प्रोजेक्टस (पीएसपी – Pumped Storage Projects) उभारले जाणार आहेत. आगामी चार ते पाच वर्षात अदानी समुह सुमारे ६० हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये करणार आहे. यामुळे ३० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच या पीएसपींच्या माध्यमातून ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या मदतीने वीज निर्मिती वा वीज संचय करणाऱ्या या प्रकल्पांचे अनेक लाभ राज्याला होणार आहेत. विशेषतः वीज टंचाईच्या स्थितीत तात्काळ वीज निर्मितीसाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरणार आहेत.

Energy department
खुर्ची जाणार म्हणून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव; जलीलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) ऊर्जा विभागाचे उपसचिव नारायण कराड व अदानी उद्योग समुहाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अजित बारोडिया यांनी प्रतिनिधी म्हणून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com