Sanjay Raut
Sanjay Raut saam Tv

अब्दुल सत्तारांचं हिंदुत्व धोक्यात आलं, याचं मला आश्चर्य वाटलं : संजय राऊत

खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. 'अब्दुल सत्तारांचं हिंदुत्व धोक्यात आलं , याचं मला आश्चर्य वाटलं, असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे

अलिबाग : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी बैठका, मेळाव्यांचा सपाटा लावला आहे. अलिबागमधील मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. 'अब्दुल सत्तारांचं हिंदुत्व धोक्यात आलं , याचं मला आश्चर्य वाटलं, असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Sanjay Raut Latest News In Marathi )

Sanjay Raut
हिंदूविरोधी सरकार वाचवण्यासाठी आमदारांना साद; एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

राज्यातील राजकीय घडामोडींवर पार्श्वभूमीवर शिवसेनेने अलिबाग येथे मेळाव्याचे आयोजन केले. त्या मेळाव्यात संजय राऊतांनी भाजप, बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले,'दि. बा. पाटील हे केवळ आगरी समाजाचे नव्हते. तर ते महाराष्ट्र आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. जिथे अन्याय झाला, तिथे दि.बा.पाटील होते. त्यांना एका समाजापुरते ठेवू नका. ते बाळासाहेबांचे मित्र होते'. बंडखोर आमदारांवर राऊत म्हणाले, ' शिवसेना राज्यात आहे, सेनेचे आमदार येथे नाही. तसेच पुढच्यावेळी आमदार वाढतील'.

'ठाण्यातल्या भाईला इकडचे दादा भारी पडतील. मुंबईतून मोठ्या प्रमाणावर मीडिया आला आहे. त्यांना वाटलं मला अटक करतील. कितीही प्रयत्न करा, मी गुवाहाटीला जाणार नाही. इथे बसलेल्या महिला खूश आहेत, आमदार पळून गेल्यामुळे. महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू आहे . पण शिवसेना संपेल. साहेबांनी शिवसेना सुरू केली. त्यानंतर २६० सेना उभ्या राहिल्या आणि संपल्या. उरल्या केवळ दोन सेना. एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना', असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Saam Sakal Survey : शिंदे गटातील बंडवीरांना मतदार पुन्हा निवडूण देणार का ? तज्ञ्ज म्हणतात...

पुढे राऊत म्हणाले, 'अब्दुल सत्तारांच हिंदुत्व धोक्यात आलं, याचं मला आश्चर्य वाटलं. बंडखोरांमध्ये २२ आमदार बाहेरून आले आहेत, तर काही राष्ट्रवादीतून आले आहेत. हे बंडखोर सेनेचे सत्ता येईल,मंत्रीपद मिळेल या अपक्षेने सेनेत आले. कोण तो भरत पादवले ? गोगावले यांना आनंद दिघे काय माहिती ? यांना २२ वर्षांनी दिघे आठवले. इस्टेट कमावली, माणसे विकत घेतली, तेव्हा दिघे आठवले नाही. आज ईडीची भीती म्हणून हिंदुत्व आठवलं'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com