खुर्ची जाणार म्हणून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव; जलीलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

तुमची खुर्ची जाणार आहे, त्यामुळे औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणत आहे,असा हल्लाबोल जलील यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) केला आहे
Uddhav Thackeray and imtiaz jaleel
Uddhav Thackeray and imtiaz jaleel saam Tv
Published On

औरंगाबाद : आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली. सदर मागणी उद्या बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी परब यांनी केली. त्यांच्या मागणीनंतर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमची खुर्ची जाणार आहे, त्यामुळे औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणत आहे,असा हल्लाबोल जलील यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) केला आहे. ( Aurangabad Latest news In Marathi )

Uddhav Thackeray and imtiaz jaleel
हिंदूविरोधी सरकार वाचवण्यासाठी आमदारांना साद; एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली. कॅबिनेट बैठक संपल्यानंतर अनिल परब प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्याचा मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे'. अनिल परबांच्या मागणीनंतर खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

जलील म्हणाले, ' तुमची खुर्ची जाणार आहे, औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव आणला जात आहे. सत्ता जाऊ नये, खुर्ची जाऊ नये म्हणून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणून लोकांना भावनिक कसे करता येईल हा प्रयत्न आहे. नाव बदलल्यानंतर दुसऱ्यादिवशी औरंगाबादकरांना पाणी मिळणार का ? ५० विमाने, १०० रेल्वे , पुण्याला घेऊन गेलेले विद्यापीठ पुन्हा मिळणार का ? असा सवाल देखील खासदार जलील यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

Uddhav Thackeray and imtiaz jaleel
अब्दुल सत्तारांचं हिंदुत्व धोक्यात आलं, याचं मला आश्चर्य वाटलं : संजय राऊत

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे .शिवसेनेने औरंगाबाद नामकरणाची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्यामुळे हिंदुत्वासाठी काम करत आहोत, असा दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होतोय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्री अनिल परब यांनी औरंगाबाद नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणल्यानंतर उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com