Maharashtra Political News: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? काँग्रेसचे १५ आमदार फुटीच्या मार्गावर?

Maharashtra Congress Political News: काँग्रेसचे १५ आमदार फुटीच्या मार्गावर असल्याचं कळतंय. येत्या महिन्याभरात राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, सूत्रांनी ही महिती दिली आहे.
Congress Political News
Congress Political NewsSaam tv
Published On

Maharashtra Political News in Marathi:

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे १५ आमदार फुटीच्या मार्गावर असल्याचं कळतंय. येत्या महिन्याभरात राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, सूत्रांनी ही महिती दिली आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत येण्याची महायुती त्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा समारोप मुंबईत २० मार्चला होणार आहे. त्याआधीच काँग्रेसचे आमदार महायुतीत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Congress Political News
Uttarakhand Civil Uniform Law: मोठी बातमी! देशातील 'या' राज्यात समान नागरी कायद्याला मंजुरी

२७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक आहे. काँग्रेसच्या १५ आमदारामुळे महायुतीला फायदा होणार आहे. याच महिन्यात हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये हा भूकंप होणार का, हे पाहणं देखील महत्वाचं आहे.

बिहारमध्ये फ्लोर टेस्टआधी राजकीय घडामोडींना वेग

महाराष्ट्रासोबत बिहारमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना १२ फेब्रुवारीला फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यानंतर बिहारमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने त्यांच्या आमदारांना हैदराबादला पाठवले आहे.

Congress Political News
Ganpat Gaikwad Firing CCTV footage: गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण; पोलीस स्टेशनमधील आणखी एक सीसीटीव्ही आला समोर

आगामी निवडणुकीआधीच नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे बिहारमधील राजकीय समीकरण बदललं आहे. त्यात बिहारमध्ये १२ फेब्रवारीला फ्लोर टेस्ट होणार आहे. याआधीच बिहार काँग्रेसचे 16 आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे . त्यापूर्वी काँग्रेसने सर्व आमदार एकत्र असावेत यासाठी निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com