Mumbai Crime News: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, मुंबईत दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला नगरमधून अटक!

Latest Crime News: आरोपीने 7 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुममध्ये कॉल करत ही खोटी माहिती दिली होती.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On

सुरज सावंत, मुंबई

Mumbai News: मुंबईमध्ये (Mumbai) तीन दहशतवादी (Terrorist) घुसल्याची खोटी आणि चुकीची माहिती देणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) ही मोठी कारवाई केली आहे. आरोपीने 7 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुममध्ये कॉल करत ही खोटी माहिती दिली होती. पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपीला अहमदनगरमधून (Ahmednagar) अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime News
Wardha Crime News : वर्ध्यात बँकेचे गेलेल्या शेतकऱ्याचे चोरट्यांनी केले दीड लाख लंपास, घटना सिसिटीव्हीत कैद

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएसने अहमदनगर जिल्ह्यातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यासीन सय्यद (४७ वर्षे) असं या आरोपीचे नाव आहे. एटीएसने यासीनला अटक करून मुंबईत पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आझाद मैदान पोलिसांकडून यासीन सय्यदची चौकशी सुरु आहे.

Mumbai Crime News
Gautami Patil Program News: महिलांच्या हाती काठ्या अन् दांडकी... असं काय घडलं गौतमीच्या कार्यक्रमात

यासीन सय्यदने ७ एप्रिल रोजी सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून तीन दहशतवादी मुंबईत आले आहेत. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, असे सांगितले होते. यावेळी त्याने यामधील एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असल्याचे सांगितले होते. त्याने मुजीबचा मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांक पोलिसांना दिला होता. या फोननंतर एकच खळबळ उडाली होती.

Mumbai Crime News
India Corona Update: चिंता वाढली! देशावरील कोरोनाचे सावट आणखी गडद, 24 तासांत 11 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

दहशतवादी घुसल्याच्या फोन येताच मुंबई पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. मुंबई पोलिसांसोबत महाराष्ट्र एटीएसने देखील याचा तपास सुरु केला. तर

पूर्व वैमनस्यातून अशाप्रकारे फोन करून खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले. आरोपीने ज्या मोबाईल नंबरवरुन हा कॉल केला होता ते सिमकार्ड त्याने २०१३ साली विकत घेतले होते. या सीमकार्डच्या मदतीने त्याने फोन केला आणि कार्ड बंद होऊ नये यासाठी तो रिचार्ज करत होता. आरोपीने हे कृत्य पूर्व वैमनस्यातून केले असल्याचे उघड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com