Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

CM Eknath Shinde On Maharashtra Assembly Elections: नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत
CM Eknath Shinde On Maharashtra Assembly ElectionsSaam Tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) आणि हरियाणा (Haryana) राज्याच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, महाराष्ट्राच्या निवडणूक कधी जाहीर होणार. याचेच उत्तर आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलं आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. चांदिवली येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत.

दरम्यान, चांदिवलीमधील मिठी नदी आणि विमानतळ बाधित कुटुंबांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हक्काच्या घरांचे वाटप करण्यात आले. आमदार दिलीप लांडे यांनी या बाबत सातत्याने पाठपूरवा करित आधिवेशनात आत्मदहन करण्याचा इशारा ही दिला होता. यातच आज क्रांती नगर आणि संदेश नगरच्या अशा ४०० कुटुंबांना हक्काच्या घराच्या चावीचे वाटप करण्यात आले.

विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत
Maharashtra Politics: कोल्हापूरच्या आखाड्यात शरद पवारांचा 'डाव', समरजित देतील मुश्रीफ यांना आव्हान, काय आहे राजकीय समीकरण?

लाडकी बहीण योजनेसाठी राज करण्याची मुद्दत वाढली

याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) एक महिना सप्टेंबर आपण वाढवला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सर्वांच्या पोटात दुखायला लागलं आहे. सर्व म्हणाले की, हा चुनावी जुमला आहे, खोटं आहे. पण दिलेल्या शब्द पाळणारा मी आहे.''

नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीचे संकेत

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''दोन महिन्यात निवडणुका आहेत... नोव्हेंबरमध्ये. तेव्हा दिलीप मामांना लवकर निवडून आणा.''

विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत
Samarjeet Ghatge: समरजित घाटगेंनी भाजप का सोडलं? ५ मुद्दे

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ''आमचं सरकार आल्यापासून आम्ही सहाशे निर्णय घेतले. त्यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये मी सुद्धा होतो. तेव्हा राज्य आपलं तिसऱ्या क्रमांकावर होतं. आता आपण ते परत पहिल्या क्रमांकावर आणलं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com