Maharashtra Politics : महायुतीचं टेन्शन वाढणार? १२ जागांवर उमेदवार उभे करणार; सपा आमदाराने दिले संकेत

Assembly Election 2024 MLA Abu Azmi Claim On 12 Seats : विधानसभा निवडणुकीसाठी आमदार अबू आझमी यांनी १२ जागांवर दावा केलाय. त्यांनी लोकांचा एमआयएम पक्षावरील विश्वास कमी होत चाललं असल्याचं म्हटलंय.
आमदार अबू आजमी
MLA Abu Azmi Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा, दावे सुरू आहेत. दरम्यान आता समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. आगामी विधानसभा निवडणुकीत बारा जागा मागणार असल्याचं आझमी म्हणाले आहेत.

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांनी मुस्लिमांविरोधात भूमिका घेतली. तरी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही? (Maharashtra Politics) याचाच अर्थ त्यांच्या बोलण्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस असल्याचं दिसून येतंय, असा आरोप अबू आझमी यांनी केलाय.

अबू आजमी नेमकं काय म्हणाले?

परंतु मुस्लिम समाज अशी वक्तव्य कदापी सहन करणार नाही, असा इशारा देखील अबू आझमी यांनी यावेळी दिला. मुस्लिम बांधवांचा एमआयएम पक्षावरील विश्वास कमी होत (Maharashtra Assembly Election) आहे. एमआयएम पक्ष हा केवळ मुस्लिम बांधवांना राजकारणासाठी वापर करून घेतो, नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. हे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आलंय. त्यामुळेच महाराष्ट्रातील लाखो मुस्लिम बांधव हे एमआयएम सोडून समाजवादी पक्षाकडे आकर्षित होत आहे. त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल, असा विश्वासही अबू आझमी यांनी यावेळी व्यक्त केलाय.

आमदार अबू आजमी
Abu Asim Azmi: अबु आझमींना जीवे मारण्याची धमकी, औरंगजेबला पाठिंबा दिल्यानं फोनवरून शिवीगाळ

राज्यात १२ जागांवर उमेदवार उभे करणार

समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी केली. त्याचाच परिणाम म्हणून 'चारशे पार'चा नारा देणारा भारतीय जनता पक्ष केवळ २४० जागा मिळवू ( MLA Abu Azmi) शकला. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील समाजवादी पक्षाचा मतदार आहे. आगामी विधानसभा मतदारसंघासाठी मुंबईतील तीन विधानसभा मतदारसंघासह राज्यात पक्ष १२ जागांवर उमेदवार उभे करणार (Assembly Election 2024) आहे. त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती देखील आमदार अबू आझमी यांनी दिलीय.

आमदार अबू आजमी
Abu Azmi News: मोठी बातमी! अबू आझमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांची ताकद वाढणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com