JN.1 Covid Cases: कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं, पुण्यातील रुग्णसंख्या ९१ वर; राज्यात काय परिस्थिती?

JN.1 Covid Cases in Pune: पुण्यात नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आरोग्य प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे.
Corona Variant JN.1 Cases
Corona Variant JN.1 CasesSaam Digital
Published On

JN.1 Covid Cases in Maharashtra

कोरोना व्हायरसचा नव्या व्हेरिएंटने संपूर्ण देशसह राज्यात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात जेएन.१ व्हेरिएंटचे आतापर्यंत ११० रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक म्हणजे राज्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल ९१ रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Corona Variant JN.1 Cases
Shocking News: माजी आमदाराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; नोटा मोजताना मशीन बंद, अधिकारीही थकले

पुण्यात नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आरोग्य प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या २४ तासांत जेएन. १ व्हेरिएंटचे तब्बल ७२ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.

राज्यात जेएन.१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर ठाणे आणि पुण्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले होते. सोलापुरात ३१ डिसेंबर रोजी खासगी रुग्णालयात जेएन.१ व्हेरिएंटमुळे पहिला मृत्यू झाला होता.

मृत व्यक्तीने कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमाचा त्रास होता. दरम्यान, नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी टास्क फोर्सला आढावा घेण्यास सांगितले होते. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असा सल्लाही दिला होता.

दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात जेएन.१ व्हेरिएंटचे ७८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुण्यात ७२ आणि नांदेड २ आणि सोलापूर, नागपुरातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. पुण्यात गुरुवारी कोरोना व्हायरसचे १५ नवीन रुग्ण आढळले आहे.

Corona Variant JN.1 Cases
Maharashtra Rain News: महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; IMDचा अंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com