राजेश भोस्तेकर, रायगड
महाड: राज्यात मागच्या वर्षी पावसानं अक्षरक्षः थैमान घातलं होतं. यात कोकण किनारपट्टीला सर्वात मोठा फटका बसला होता. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात 21जुलै आणि 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुराने (Mahad Flood 2021) त्रस्त झालेले महाडकर आज प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रस्त्यावर उतरले आणि महारपुराच्या उपाययोजना करण्याची मागणी करत घोषणाबाजीही केली. (Mahadkar fears flood; On flood-affected people agitation to demand solutions)
हे देखील पहा -
यावेळी पुरग्रस्त महाडकरांनी "एक दिवस महापूराचा, जिव जातो महाडकरांचा", "पुराचे पाणी वेगाने जाईल, तरच महाड सुरक्षित राहिल" अशा विवीध घोषण दिल्या. महाड (Mahad) शहरातील गांधारी नाका येथुन या मोर्च्याला (Morcha) प्रारंभ झाला. मोहल्ला, साळीवाडा नाका, पिंपळपार, बाजार पेठ, भगवानदास बेकरी, जुना पोस्ट, नवी पेठ असा हा मोर्चा महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. महाड पुरनिवारण समितीचे पदाधिकारी आणि महाडकर वक्त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाड तालुक्यातील नद्यांमधील गाळ काढणे, दासगाव - गोठे परीसरातील कोकण रेल्वेने टाकलेला भराव काढणे आणि छोटे-मोठे बंधारे बांधणे या कामांवर भर देत पुर निवारणाची कामे सुरु करण्यासाठी शासनाला केवळ चार दिवसांचा निर्वाणीचा इशारा दिला. जर चार दिवसात शासन आणि प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही तर कोकण रेल्वे आणि महामार्ग जाम करणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.