Maharashtra Politics : मविआ महामोर्चा विरुद्ध भाजप आंदोलन; काँग्रेसनं म्हटलं, 'चोराच्या उलट्या बोंबा'...

MVA Mahamorcha vs BJP Protest : महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय रण पेटलंय.
Nana Patole-Devendra Fadnavis
Nana Patole-Devendra FadnavisSAAM TV
Published On

MVA Mahamorcha vs BJP Protest : महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय रण पेटलंय. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईत उद्या, शनिवारी महामोर्चा काढण्यात येणार आहे, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात भाजप 'माफी मांगो' आंदोलन करणार आहे. भाजपच्या आंदोलनावर काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे. मविआच्या मोर्चाविरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपने आधी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन काढण्याची नौटंकी भाजप करत आहे, असं टीकास्त्र नाना पटोले यांनी सोडलं.

महापुरुषांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपच्या वाचाळविरांविरोधात मूग मिळून गप्प बसणारे आता मात्र महापुरुष व हिंदू देवतांच्या नावाखाली आंदोलन करत आहेत. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असून याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असे म्हणतात, असा घणाघातही पटोले यांनी केला.  (Latest Marathi News)

Nana Patole-Devendra Fadnavis
Mahavikas Aghadi Morcha: मविआच्या मोर्चासाठी दोन ते अडीच हजार पोलिसांसह SRPFची चोख सुरक्षा; ड्रोनद्वारे ठेवली जाणार नजर

'राज्यातील वातावरण बिघडवलं जातंय'

नाना पटोले म्हणाले की, 'राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी लोकांची दादागिरी वाढली आहे. राजरोसपणे धमक्या देण्याचे प्रकारही वाढले आहेत. राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार प्रसाद लाड यांनी महापुरुषांबद्दल काढलेले उद्गार हे महापुरुषांचा व त्यांच्या कार्याचा अपमान करणारेच होते, त्यात दुमत नाही. पण भाजपच्या एकाही नेत्याने या वाचाळवीरांवर कारवाई केली नाही व माफी मागण्याचे सौजन्यही दाखवले नाही. उलट या वाचाळवीरांचा बचाव करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्यासाठी भीक मागितली असे म्हणून त्यांचाही अपमान केला, त्यावेळी भाजप व आमदार आशिष शेलार कुठे होते? हा या महापुरुषांचा अपमान नाही का ? यावर भाजपाने माफी मागितली का? (Nana Patole)

Nana Patole-Devendra Fadnavis
MVA Mahamorcha : 'मविआ'च्या महामोर्चाला परवानगी; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मुंबईत उद्या महाविकास आघाडीचा महामोर्चा

मुंबईत उद्या, १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा हा अतिप्रचंड व भाजपच्या बोलघेवड्यांची बोलती बंद करणारा असेल. भाजपची जनतेत पत राहिलेली नाही, जनतेत प्रचंड असंतोष आहे म्हणून उरलेली पत राखण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपचे आमदार आशिष शेलार करत आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

हिंदू देव-देवतांवर बोलण्याचा भाजपला अधिकार नाही. प्रभू रामांच्या नावावर ज्यांनी कोट्यवधी जनतेकडून पैसे घेऊन स्वतःचे खिसे भरले, अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या कार्यात जमीन घोटाळे करून पैसे खाल्ले, त्यांना देवदेवतांवर बोलण्याचा काय अधिकार? हिंदू भावनांचा केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्या भाजपने देवदेंवतांवर बोलू नये. हिंदू देवदेवता व महापुरुषांवरचे भाजपचे प्रेम बेगडी असून जनता सुज्ञ आहे, त्यांना खरे खोटे सर्व कळते, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com