MVA Mahamorcha : 'मविआ'च्या महामोर्चाला परवानगी; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

महापुरुषांबद्दल राजकीय नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून महाराष्ट्राचं राजकारण पेटलं आहे.
BJP Devendra Fadnavis
BJP Devendra FadnavisSAAM TV

Devendra Fadnavis On MVA Mahamorcha : भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा उद्या, १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला परवानगी दिली जाणार का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला पोलीस परवानगी देतील का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जो काही मोर्चा निघणार आहे, तो शांतपणे व्हावा. या मोर्चाला परवानगी दिली आहे. लोकशाही पद्धतीने विरोध करायचा असेल तर ते करतील. कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, अशी माहिती फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. माझ्या माहितीप्रमाणे मोर्चाला परवानगी मिळालेली आहे. त्यांनी मोर्चाचा जो काही मार्ग सांगितला आहे, तो मान्य झाला आहे. त्यामुळं परवानगी देण्याबाबत काही अडचण आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.  (Latest Marathi News)

BJP Devendra Fadnavis
महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा पेटला; मुंबईत उद्या 'मविआ'चा महामोर्चा विरुद्ध भाजपचं माफी मांगो आंदोलन

संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं वक्तव्य केलं होतं. तर सुषमा अंधारे यांनीही काही दिवसांपूर्वी वक्तव्ये केली होती. याविरोधात भाजप उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वारकरी, संतांबद्दल बोलतात, प्रभू श्रीराम, कृष्णांबद्दल जे काही उद्गार काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे बोललं जातंय, अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात लोकांमध्ये मोठा संताप आहे, तो व्यक्त करावाच लागेल, असेही फडणवीस म्हणाले. (Sanjay Raut)

BJP Devendra Fadnavis
Sanjay Raut : डॉ. आंबेडकर हे महाराष्ट्राचेच सुपुत्र; आम्हाला काय अक्कल शिकवताय? : संजय राऊत

कोकण महामार्गासंदर्भात राज यांनी भेट घेतली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल फडणवीसांची भेट घेतली. याबाबतही स्वतः फडणवीस यांनी माहिती दिली. राज ठाकरे यांनी कोकण महामार्गासंदर्भात भेट घेतली होती. कोकण महामार्गाचे काम अर्धवट आहे. नुकतेच ते तिकडून आले. त्यांनी बघितलं. त्यामुळं त्यांनी भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. या महामार्गासंदर्भात नितीन गडकरींनी पुढाकार घेतला आहे. ते स्वतःही गडकरींशी बोलणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

'राऊतांना कुणी गांभीर्याने घेत नाहीत'

नाशिकमधील उद्धव ठाकरे गटातील काही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावरून संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास नाही. जर ते दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल. कालपर्यंत ते चांगले होते. ही जी काही भाषा ते वापरतात त्याचा लोकांना राग येतो, लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, असा टोला फडणवीस यांनी राऊत यांना लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com