Madha Lok Sabha: माढाचा तिढा सुटला, पण पेच वाढला ; शरद पवारांच्या भेटीनंतर अभयसिंह जगताप घेणार पुढील निर्णय

Madha Lok Sabha Election Update :माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर अभयसिंह जगताप यांनी बंडाची तयारी केली आहे. मात्र, आज अभयसिंह जगताप हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
Madha Lok Sabha constituency
Madha Lok Sabha constituencySaam TV

सागर आव्हाड, पुणे

Madha Lok Sabha Election :

राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय तापमान देखील वाढू लागलं आहे. राज्यातील माढा लोकसभेतही मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर अभयसिंह जगताप यांनी बंडाची तयारी केली आहे. मात्र, आज अभयसिंह जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर निवडणुकीबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज होऊन बंडखोरीची तयारु सुरु केलेले अभयसिंह जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली. ते माढा लोकसभेसाठी इच्छुक होते. धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभयसिंह जगताप नाराज झाले होते. माढा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. काल रविवारी जयंत पाटील यांनी त्यांना अपक्ष उमेदवारी भरू नये, अशी विनंती केली होती.

Madha Lok Sabha constituency
Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; संजय राऊत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

अभयसिंह दोन दिवसांत निर्णय घेणार

माढामधील शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप हे दोन दिवसात निर्णय घेणार आहे. आज रविवारी प्रकाश आंबेडकर यांची तर उद्या राजू शेट्टींची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच अभयसिंह जगताप राष्ट्रवादी सोडण्याच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन समाधान झाले नसल्याचं समोर आलं आहे.

Madha Lok Sabha constituency
Satara Loksabha: साताऱ्यात आज शरद पवारांचे शक्तीप्रदर्शन; शशिकांत शिंदे भरणार उमेदवारी अर्ज

शरद पवारांच्या भेटीनंतर अभयसिंह जगताप काय म्हणाले?

या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना अभयसिंह पाटील म्हणाले,'मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो. मी अनेक स्वप्न माढा लोकसभा मतदारसंघातून पाहिली होती. पण स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीत. मी कुठल्याही उमेदवाराचे काम करणार नाही. मी स्वतः अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com