Satara Loksabha: साताऱ्यात आज शरद पवारांचे शक्तीप्रदर्शन; शशिकांत शिंदे भरणार उमेदवारी अर्ज

Satara Loksabha News: अर्ज दाखल करण्यास खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात रॅली काढून महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
Satara Loksabha News
Satara Loksabha NewsSaamtv

सातारा|ता. १५ एप्रिल २०२४

साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे आज आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

साताऱ्यात शरद पवारांचे शक्तीप्रदर्शन..

साताऱ्यात आता लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवारआमदार शशिकांत शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यास खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात रॅली काढून महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

शशिकांत शिंदे भरणार अर्ज..

राजवाडा येथील गांधी मैदान येथून सकाळी ११ वाजता आ. शशिकांत शिंदे यांच्या रॅलीस सुरवात होणार आहे. या रॅलीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही रॅली राजवाडा, मोती चौक, राजपथ, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, मल्हार पेठ, पोलिस मुख्यालय मार्गे पोवईनाका येथे जाणार आहे.

Satara Loksabha News
Maratha Reservation: 6 जूनपर्यंत आरक्षण न दिल्यास उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

शिवतीर्थ पोवईनाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

महायुतीचा उमेदवार ठरेना!

दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जात असताना महायुतीचा उमेदवार मात्र अद्याप ठरलेला नाही. साताऱ्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटही आग्रही आहे. तर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. आज महायुतीचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

Satara Loksabha News
Maratha Reservation: 6 जूनपर्यंत आरक्षण न दिल्यास उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com