Mumbai News: PM मोदींचे शिवाजी पार्क परिसरातील कटआऊट्स हटवले, निवडणूक आयोगाची कारवाई

PM Modi Cutouts And Banners Removed: शिवाजी पार्क परिसरामध्ये भाजपकडून पीएम मोदींच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी आणि होर्डिंग्स लावण्यात आले होते. पण निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) कारवाई करत पीएम मोंदीचे होर्डिंग्स आणि बॅनर हटवले.
Mumbai News: PM मोदींचे शिवाजी पार्क परिसरातील कटआऊट्स हटवले, निवडणूक आयोगाची कारवाई
PM Modi Cutouts And Banners RemovedSaam Tv

सचिन गाड, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची उद्या मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्त भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आले होते. शिवाजी पार्क परिसरामध्ये भाजपकडून पीएम मोदींच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी आणि होर्डिंग्स लावण्यात आले होते. पण निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) कारवाई करत पीएम मोंदीचे होर्डिंग्स आणि बॅनर हटवले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क परिसरात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेले नरेंद्र मोदी यांचे मोठे कट आउट निवडणूक आयोगाने हटवले. उद्या शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा होणार आहे. अशामध्ये निवडणूक आयोगाने शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेले महायुतीचे सर्व अनधिकृत बॅनर्स हटवले आहेत. मोठ्या पोलिस बंदोबस्तात हे बॅनर हटवण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

Mumbai News: PM मोदींचे शिवाजी पार्क परिसरातील कटआऊट्स हटवले, निवडणूक आयोगाची कारवाई
Mumbai News: मुंबईकरांचं मरण, होर्डिंगवरून राजकारण; भुजबळ ठाकरेंच्या पाठीशी, भाजप पडले तोंडघशी

शिवसेना भवन ते शिवाजी पार्क या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी पीएम मोदींचे बॅनर आणि कटआऊट लावण्यात आले होते. निवडणूक आयोगाने आदेश दिल्यानंतर मोठ्या पोलिस बंदोबस्तात हे बॅनर हटवण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. पीएम मोदींचे बॅनर आणि कटआऊट हटवल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Mumbai News: PM मोदींचे शिवाजी पार्क परिसरातील कटआऊट्स हटवले, निवडणूक आयोगाची कारवाई
Loksabha Election 2024: नादखुळा! तिरडीवर बसून अर्ज भरायला पोहोचला उमेदवार, स्मभानभूमीत थाटले 'प्रचार' कार्यालय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com