मुंबई: देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवरून शिवसेनेने (Shivsena) भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामना या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने 'ऑपरेशन लोटस'ची तुलना दहशतवादी संघटना अल कायदाशी केली आहे. भाजपचा संबंध दहशतवादाशी जोडण्यात आला आहे, असे आरोप शिवसेनेने केले आहेत. शिवसेनेने आपल्या लेखात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दाखलाही दिला आहे. "आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी करण्यात आलेले ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे.", असंही यात म्हटले आहे.
सरकार निवडणून आणण्याऐवजी विरोधकांचे सरकार पाडण्याचा आणि पक्ष फोडण्याच्या राजकीय घटना सध्या देशात जास्त घडत आहेत. त्यामुळे विष्णूचे आवडते फूल 'कमळ' बदनाम झाल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
'ऑपरेशन लोटस' ही अल-कायदासारखी दहशतवादी संज्ञा बनली आहे. दिल्ली सरकार पाडण्यासाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन अपयशी ठरल्याचे शिवसेने म्हटले आहे. सामनामध्ये बिहारचाही उल्लेख केला आहे, सध्या बिहारमध्ये सरकार बदलले आहे. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी चंद्रशेखर राव यांनी अमित शहांना 'ईडी, सीबीआय (CBI) वगैरे लादून माझे सरकार पाडून दाखवा' असे खुले आव्हान दिले आहे, असंही लेखात म्हटले आहे.
ईडी, सीबीआयचा (CBI) वापर करून केजरीवाल सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली सरकारचे मद्य धोरण, उत्पादन शुल्क धोरण, दारू विक्रेत्यांना दिलेली कंत्राटे, हे भाजपच्या दृष्टिकोनातून टीकेचे विषय असतील पण हा निर्णय वैयक्तिक नव्हता. संपूर्ण सरकार सोबत होते. दिल्लीचे राज्यपाल यांचीही या निर्णयांना सहमती होती. मात्र मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे सर्व खापर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर फोटण्यात आले आहे. त्यांच्यावर सीबीआयचे छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांना क्रमांक एकचे आरोपी बनवण्यात आले आहे, असा आरोपही यात करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.