Lalbaugcha Raja: मुंबईतील 'लालबागचा राजा' च्या विसर्जनाला उशीर का झाला? नेमकं काय आहे कारण?

Lalbaugcha Raja Ganpati Visarjan : मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती, लालबागचा राजाचे विसर्जन उशीर होत आहे. विसर्जन साधारणपणे २०-२५ तास चालते, परंतु ३० तासांनंतरही विसर्जन होत आहे. विसर्जनाला उशीर का झाला ते येथे आहे.
Lalbaugcha Raja Ganpati Visarjan
Devotees await the immersion of Lalbaugcha Raja as visarjan stretches beyond 30 hours in Mumbai.saamtv
Published On
Summary
  • लालबागचा राजा विसर्जन यंदा नेहमीपेक्षा उशिरा झालं.

  • साधारण 20-25 तास चालणारी विसर्जन यात्रा 30 तास उलटूनही पूर्ण झाली नव्हती.

  • गर्दी, सुरक्षा आणि व्यवस्थापनामुळे विलंब झाल्याची माहिती समोर आली.

  • भाविकांनी विसर्जन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

मुंबईतील बहुतेक गणेश मंडळांनी गणरायाला निरोप दिला. परंतु सर्वात प्रसिद्ध गणपती असलेल्या लालबागचा राजाची विसर्जन अद्याप झालेलं नाहीये. लालबाग राजा गणपतीची विसर्जन यात्रा सुमारे 20-25 तास चालते परंतु ३० तास उलटूनही लालबाग राजाचे विसर्जन झालं नाहीये.

नेहमी नियमात वेळेत होणाऱ्या विसर्जनला विलंब का होतोय, असा प्रश्न विचारला जात आहे. राजाचं विसर्जन कधी होणार याची माहिती मंडळाकडून देण्यात आलीय. मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ, लालबागचा राजा, लोकांच्या श्रद्धा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. लालबाग परळ परिसरात असलेले हे पंडाल दरवर्षी जगभरातील भाविकांना आकर्षित करते. भाविक केवळ दर्शनासाठीच नव्हे तर दूरवरूनही आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या आशेने येत असतात.

Lalbaugcha Raja Ganpati Visarjan
Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

परंतु गिरगाव चौपाटीवर लालबाग राजाचं विसर्जन का झालं नाही याचे कारण समोर आले आहे. लालबागचा राजा मंडळाकडून अत्याधुनिक तराफा या वर्षी विसर्जनासाठी तयार करण्यात आलाय. सुरुवातीला मिरवणूक रथावरून तराफ्यावर चढवण्यात अडचण निर्माण येत होती. शेवटी लालबागचा राजा आज दुपारी साडेचार तराफ्यावर घेण्यात आलं. आज रात्री साडे दहानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल,अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

Lalbaugcha Raja Ganpati Visarjan
Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

' 10-15 मिनिटांचा उशीर

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मानद सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विसर्जन मिरवणूक २४ तास चालली. दुपारनंतर मुंबईत पाऊस परतला,त्यामुळे भरती लवकर आली. राजाचे विसर्जन भरतीवर अवलंबून असतं. ओहोटीवेळी आम्ही तराफ्यावर घेतो आणि तराफा भरतीवेळी जातो आणि विसर्जन होतं. भरती लवकर आली आणि आम्ही दहा ते पंधरा मिनिटे उशीरा आलो, अशी माहिती सुधीर साळवी दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना फोन करून विचारपूस केली. दिवसभरात लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात आलेल्या अडचणी संदर्भात उद्धव ठाकरेंनी माहिती जाणून घेतली. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचंही आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com