खुशखबर! लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणींना उद्या हप्ता बँक खात्यात जमा होईल.
Ladki Bahin Yojana Latest Update
Ladki Bahin Yojana Updategoogle
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात उद्या हप्ता जमा होणार

२१ ते ६० वयोगटातील महिलांना योजनेचे पैसे मिळताहेत

महिलांमध्ये प्रसिद्ध असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारकडून १४ जून रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा ३७ वा हप्ता ट्रान्सफर करण्यात येणार आहे. १.२५ कोटींहून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात रविवारी पैसे जमा होतील.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. या योजनेअंतर्गत विवाहित, घटस्फोटीत, विधवा महिलांनाही लाभ मिळत आहे. मध्य प्रदेशातील ही योजना २१ ते ६० वयोगटातील महिलांसाठी लागू आहे.

Ladki Bahin Yojana Latest Update
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांहून कमी असणे गरजेचे आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न फाइल भरत असेल, तर त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. एखाद्या कुटुंबात सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक असल्यास त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

महिला राज्य किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेच्या माध्यमातून महिना १,२५० रुपयांचा लाभ घेत असेल, तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केलं आहे.

आधार बँक खात्याशी लिंक असलेल्या सर्व पात्र महिलांच्या खात्यात उद्या १५०० रुपये येण्यास सुरुवात होईल. आधारकार्ड बँकेशी लिंक नसलेल्या महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार नाही, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Ladki Bahin Yojana Latest Update
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; 'या' महिलांवर कडक कारवाईचे संकेत

महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींना कधी पैसे मिळणार?

महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना चांगलीच प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही मे महिन्याचा हप्ता येणे बाकी आहे. लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनाही मे महिन्याचा हप्ता येत्या आठवड्याभरात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com