Kirit Somaiya: पेडणेकर आणि जाधवांपासून मुंबईकरांची मुक्तता होणार, सोमय्यांची बोचरी टीका

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका करत पेडणेकर आणि जाधवांपासून मुंबईकरांची मुक्तता होणार आहे, असं वक्तव्य केलं आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSaam Tv
Published On

सुशांत सावंत -

मुंबई: बीएमसी महापौर किशोरी पेडणेकर यांचा महापौर म्हणून आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांचा कार्यकाळ आज संपतो आहे. तसेच, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचाही कार्यकाळ आज संपतोय. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका करत पेडणेकर आणि जाधवांपासून मुंबईकरांची मुक्तता होणार आहे, असं वक्तव्य केलं आहे (Kirit Somaiya Criticize Kishori Pednekar And Yashwant Jadhav).

Kirit Somaiya
Kishori Pednekar: उद्यापासून मी महापौर नसले तरीही मुंबईची काळजी घेणार - किशोरी पेडणेकर

किरीट सोमय्या काय म्हणाले?

"गरिब झोपडपट्टीवासियांचे एसआरएचे गाळे ढापणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि नाले सफाई कॉन्ट्राक्टरशी संगनमत करुन शेकडो कोटीचे घोटाळे करणारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांपासून आज मुंबईकरांची मुक्तता होणार!", अशी जळजळीत टीका करणारं ट्विट किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं.

महापौरांचा कार्यकाळ संपला

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचा मुंबईच्या महापौर म्हणून कार्यकाळ आज संपणार आहे. तर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांचाही कार्यकाळ आज संपतोय. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापौर पुन्हा शिवसेनेचाच होणार, असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच, उद्यापासून मी महापौर नसले तरीही मुंबईची काळजी मी घेणार, असंही त्या म्हणाल्या.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com