4 महिन्यांपूर्वीच सिया-चेतनचं गुपचूप लग्न? व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठं गूढ उकलणार?

Ketan Agrawal Murder Case Latest Updates Pune: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचं गूढ अद्यापही उलगडलेलं नाहीये. अशातच आता या प्रकरणातील आरोपी सियाच्या जबाबानं पोलिसही चक्रावून गेलेत. पोलिसांसमोर कसा नवा पेच निर्माण झालाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Accused Siya Goyal in custody as new revelations, including secret marriage and WhatsApp chats, emerge in the Ketan Agrawal murder case.
Accused Siya Goyal in custody as new revelations, including secret marriage and WhatsApp chats, emerge in the Ketan Agrawal murder case.saam tv
Published On

केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सिया गोयलचे प्लॅनिग पाहून कसलेले वकील आणि पोलीसही चक्रावून गेलेत....त्यातच आता पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हॉट्सॲप चॅटवरून आणखी एक खळबळजनक खुलासा समोर आल्याचं कळतंय...सिया आणि तिचा प्रियकर चेतननं 4 महिन्य़ापूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय...त्यामुळे हत्येपूर्वी सियानं केलेला अभ्यास आणि कायदेशीर पळवाटा शोधण्याची तिची पद्धत एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवणारी आहे.

सिया गोयल हिने केतन अग्रवाल याला मारण्यापूर्वी हत्या कशी करायची, पकडले गेल्यास काय करायचे, याचा सखोल अभ्यास केला होता. यासाठी तिने गुगल, वेब सिरीज आणि काही पॉडकास्ट पाहिले होते. महिला गुन्हेगारांना पोलीस कोठडीत कशी वागणूक मिळते? याचीही माहिती सियानं गोळा केली होती...तसंच हत्येच्या गुन्ह्यात जामीन किती दिवसांनी आणि कसा मिळतो? हे जाणून घेण्यासाठी देशात गाजलेल्या 'राजा रघुवंशी हत्याप्रकरणाचा' सियानं सखोल अभ्यास केला...त्या प्रकरणातील आरोपी 'सोनम रघुवंशी' हिने जामीन कसा मिळवला? तसाच प्लॅन जामीन मिळवण्याचा सियानं आखल्याचं बोललं जातयं...

सिया आणि चेतन दोघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र एका 20 वर्षांच्या तरुणीने वेबसिरीज आणि इंटरनेटचा वापर करून रचलेला हा क्रूर कट पाहून पुणे पोलीसही चक्रावून गेलेत...क्राईम वेबसिरीज आणि सोशल मीडियावरील पॉडकास्ट तरुण पिढीच्या डोक्यात कशाप्रकारे गुन्हेगारीचं विष पेरतायत, याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे 4 महिने आधीच लग्न झालेलं असताना सियानं केतनसोबत लग्नाचा बनाव का केला? केतनची हत्या पैशांसाठी झाली की यामागे आणखी मोठं कारण आहे... हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com