केतनच्या हत्येचे गूढ वाढले, पोलीस चक्रावले; लाय डिटेक्टर' टेस्टसाठी पोलीस कोर्टात

Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि तिच्या प्रियकराची लाय डिटेक्टर टेस्ट केली जाऊ शकतो. यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी थेट न्यायालयात धाव घेतलीये. मात्र, पुरेशा पुराव्यांअभावी सियाला जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झालीये. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.
Ketan Agrawal Death Case:
Ketan Agrawal murder case latest updatesaam tv
Published On

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाचं गूढ अद्यापही उकललेलं नाहीये. पुणे ग्रामीण पोलिसांचा तपास केतनची हत्या नेमकी कुणी केली इथंवर येऊन अडकलाय. केतनला लोहगडावरून धक्का नेमका कुणी दिला, याचा खुलासा होत नसल्यानं पोलीस आरोपींची 'लाय डिटेक्टर' टेस्ट करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात अर्जदेखील सादर केलाय.

Ketan Agrawal Death Case:
केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

महत्त्वाचं म्हणजे, पुराव्यांचा अभाव असल्यानं तपासाला गती देण्यासाठी आणि नवीन धागेदोरे शोधण्यासाठी सियाची पॉलीग्राफ चाचणी करणं अत्यंत आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय. त्यामुळे, या हत्या प्रकरणातचं मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखाच होणार की काय अशी शक्यता निर्माण झालीय. काय आहे राजा रघुवंशी हत्या प्रकरण त्यावर एक नजर टाकूयात.

Ketan Agrawal Death Case:
Lohagad Fort: लोहगडचा रहस्यमय किल्ला कधी आणि कोणी बांधला? जाणून घ्या इतिहास

सोनम सुटली सियासुद्धा सुटणार?

इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशीचं 11 मे 2025 रोजी सोनमशी लग्न झालं. लग्नानंतर हनीमूनसाठी मेघालयाला गेलेला राजा चेरापुंजीमध्ये बेपत्ता झाला. मात्र, काही दिवसांनंतर राजाचा मृतदेह एका खोल दरीतून सापडला. सोनमनं आपला प्रियकर आणि काही साथीदारांच्या मदतीने हत्येचा कट रचला होता. मात्र, पोलीस जबाबात सोनमनं आपल्या पतीसह स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला होता.

पोलीस तपासानंतर, सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोनमला अटक केल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत न्यायालयात 700 पानांचे आरोपपत्र दाखल केलं. पोलिसांनी ही घटना आर्थिक फायद्यासाठी केलेली पूर्वनियोजित हत्या असल्याचं म्हटलं. मात्र पोलिसांकडे सबळ पुरावे नसल्यामुळे अखेर सोनमची जामिनावर सुटका झाली.

खरंतर, पॉलीग्राफ चाचणीतून आरोपींकडून सत्य वदवून घेतले जाईल. मात्र, हा अहवाल न्यायालयात ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. तो केवळ पोलिसांना तपासाची दिशा ठरवण्यासाठी कामी येतो. त्यामुळे केतनला लोहगडावर धक्का कुणी दिला याचे सबळ पुरावे हाती लागले नाहीत तर सियाचीही सोनमसारखीच जामिनावर सुटका होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com