
(अभिजीत देशमुख)
केडीएमसीमध्ये घनकचरा विभागात स्वच्छता निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली आहे. यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. केडीएमसीच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला? वेतनवाढ रोखू नका. केडीएमसीची हिटलरशाही मनसे चालू देणार नाही, असा इशारा दिला.(Latest News)
मनसेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर केडीएमसीने आपल्या कारवाईबाबत स्पष्टीकरण दिलंय. पालिकेचे घनकचरा विभागाचे आयुक्त अतुल पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले. संबंधित कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांची वेतनवाढ रोखली असल्याचे सांगितले. जर त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचं कौतुक देखील करू, असं पाटील म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचरा प्रश्न गंभीर बनलाय. .कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने ठोस पाऊल उचलले आहेत. ओला कचरा ,सुका कचरा ,बायोगॅस प्रकल्प आदी उपक्रम हाती घेतले आहेत. घनकचरा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. केडीएमसीने कामात हलगर्जीपणा ,निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत घनकचरा विभागात स्वच्छता निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली.
या निर्णयानंतर संबंधित कर्मचारी वर्गात नाराजीचा वातावरण पसरले आहे. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली आहे. यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महापालिका मुख्यालयात घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचे भेट घेत त्यांना जाब विचारला. वेतनवाढ रोखू नका, आमचे एसआय सकाळी पासून दुपारपर्यंत काम करतात ड्युटीच्या अतिरिक्त ४ वाजेपर्यंत काम करतात. दुपारी ४ वाजेनंतर जे कचरा पडतो, त्यामध्ये आमच्या एएसआय कर्मचाऱ्यांचे काय दोष आहे.
ही हिटलरशाही मनसे चालू देणार नाही, असा इशारा केडीएमसीला देण्यात आला. तर घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यानी कायद्यानुसार ही कारवाई झालेली आहे. कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचं कौतुक देखील केलं जाईल, असं म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.