KDMC News: संतापजनक! केडीएमसीच्या रुग्णालयाने महिलेची प्रसूती करण्यास दिला नकार

Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात एका गरोदर महिलेला प्रसूतिकरीता दाखल करण्यात आले होते.
Kalyan Dombivli News
Kalyan Dombivli NewsSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख

Kalyan Dombivli News:

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात एका गरोदर महिलेला प्रसूतिकरीता दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगून तिची प्रसूती करण्यास रुग्णालयाने नकार दिला. त्याच गरोदर महिलेला मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल केले असता तिची विनाशस्त्रक्रिया प्रसूती झाली आहे. या घटनेवरुन महापालिकेच्या रुग्णलायात उपचार न करता रुग्णाना मुंबईला पाठविले जाते ही धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका शर्मा, असे या गरोदर महिलेचे आहे. त्या त्यांच्या माहेरी प्रसूतीकरीता आल्या आहेत. त्यांनी प्रसूतीसाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात ३ महिन्यापूर्वीच नाव नोंदणी केली आहे. त्यांच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना प्रसूतीकरीता शास्त्रीनगर रुग्णलायात रविवारी सायंकाळी पाच वाजता दाखल केले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Dombivli News
PM मोदींनी ऋषी सुनक यांना केला फोन, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

मात्र त्यांच्या रक्तातील प्लेट लेटस् कमी असल्याने त्यांची प्रसूती करता येणार नाही, असे कारण रुग्णलयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले. त्या प्रसूतीकरीता फिट आहेत की नाही याचीही वैद्यकीय चाचणी केली असता त्यांची प्रसूती होऊ शकते, असा रिपोर्ट आला. तरी देखील डॉक्टरांनी त्यांची प्रसूती करणे हे महिलेचा जिविताला धोकादायक ठरू शकते (Latest Marathi News)

या सगळ्या प्रक्रियेत सोमवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेळ वाया गेल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबियांनी केला. अखेरीस महिलेच्या कुटुंबियांना तिला मुंबईतील शीव रुग्णलयात नेले. त्याठिकाणी पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्रसूती करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असे त्याठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले. आज पहाटे २ वाजताच्या सुमारास या महिलेची विना शस्त्रक्रिया प्रसूती प्रक्रिया पार पडली. तिने बाळाला जन्म दिला आहे.

Kalyan Dombivli News
Manohar Lal Khattar: भाजपने अचानक मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून का हटवले? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

बाळ आणि त्याची आई सुखरुप आहेत. अशा प्रकारच्या घटनामुळे महापालिकेकडून रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात हेळसांड केली जाते. हेच उघड झाले आहे. या प्रकरणी दोषींच्या विरोधात महापालिकेच्या आयुक्त कारवाई करणार आहेत की नाही असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान या घटनेविषयी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे प्राप्तच झालेली नाही असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com