KDMC Pothole Issue : कल्याण-डोंबिवली पालिका शहर अभियंत्यांची कंत्राटदार-संबंधित अभियंत्यांना तंबी; खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास कारवाईचा इशारा

Kalyan Dombivli News : पावसामुळे कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत.
KDMC News
KDMC NewsSaam Tv
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan News : खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

 पावसाच्या पार्श्वभुमीवर कल्याण डोंबिवली रस्त्यांची पाहणी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी पालिकेचे अधिकारी ठेकेदारांसोबत पाहणी केली. तसेच रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरण्याच्या सूचना केल्या.

पावसामुळे कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने भरण्याचे आदेश शहर अभियंता यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिले होते. आज शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसह दुर्गाडी किल्ला परिसर, पत्रीपूल, गोविंदवाडी, उंबर्डे, सहजानंद चौक, म्हसोबा चौक ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर, लोकमान्य टिळक चौक आदी परिसरातील रस्त्यांची आणि खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली. (Maharashtra News)

KDMC News
Mumbai Dam Water Level Today : मुंबईकरांची तहान भागवणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो; इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध?

यावेळी अहिरे यांनी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्डे पडले असून सदर खड्डे भरण्याचे काम सुरू असून पावसामुळे काहीशी अडचण येत असली तरीही हे काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे. क्विक सेटिंग सिमेंटच्या माध्यमातून हे खड्डे भरण्याच्या सूचना शहर अभियंता अहिरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

KDMC News
Schools Closed tomorrow in Palghar due to Heavy Rain : पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्याही सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

खड्डे भरण्याचे काम रात्री करण्याच्या तसेच संबंधित जबाबदार अभियंत्याने दररोज रस्त्यांवर प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचनाही अर्जुन अहिरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याकरिता खड्डे भरून रस्ते सुस्थितीत आणण्याचे निर्देश अधिकारी व ठेकेदारांना देण्यात आले. खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com