Schools Closed tomorrow in Palghar due to Heavy Rain : पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्याही सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Palghar Rain Update : उद्या 21 जुलै रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
Palghar Rain Update
Palghar Rain UpdateSaam TV
Published On

Palghar News : पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्याची सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22 जुले रोजीपर्यंत पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक उद्या 21 जुलै रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे. ( Rain News)

Palghar Rain Update
Konkan Railway disrupted : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्यात रेल्वे स्थानकांत थांबल्या

पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात शुक्रवारी देखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालघरमध्ये शुक्रवारी रेड अलर्ट जाहीर केला आहे.  (Maharashtra News)

Palghar Rain Update
Warning Signs Of Landslide : दरड कोसळण्यापूर्वी काय संकेत मिळतात? आजूबाजूच्या छोट्या बदलांमधून ओळखता येईल मोठा धोका

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचलं

मुंबई-अहमदाबाद महामार्ग रस्त्यांना आज नदीचे स्वरूप आले होते. सकाळपासून पडत असलेल्या  पावसामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com