Mumbai News : मुंबईची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात मागील दोन दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
मुंबईला ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा आज मध्यरात्री ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही ८०४.६० कोटी लीटर इतकी आहे. (rain)
गेल्या वर्षी हा तलाव १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. तर २०२० मध्ये २७ जुलै; २०१९ मध्ये १२ जुलैला हा तलाव ओसंडून वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर इतकी असून आज पहाटे ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर म्हणजेच ३९.६१ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. (Maharashtra News)
अप्पर वैतरणा तलावात ३,३६०.५० कोटी लीटर
मोडक-सागर तलावात ८,१२१.४ कोटी लीटर
तानसा तलावात १०३०३.१ कोटी लीटर
मध्य वैतरणा जलाशय ९८०९.५ कोटी लीटर
भातसा तलावात २३,१९२ कोटी लीटर
विहार तलावात १७४२.७ कोटी लीटर
तुळशी तलावात ८०४.६ कोटी लीटर
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.