कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीची टिमकी मिरवते. मात्र, अजून महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय (Rukminibai Hospital)आणि शास्त्रीनगर रुग्णालय (Shastrinagar Hospital) स्मार्ट झालेले नाहीत. 10 महिन्यांपूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात आयसीयु विभाग सुरू करण्यात आला. मात्र, तो अवघ्या 10 दिवसात बंद झाला. त्यानंतर नीविदा प्रक्रियेत अडकलेला आयसीयु विभाग आजही टाळेबंद अवस्थेत आहे. त्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. रुग्णांना उपचारासाठी कळवा, मुंबई रुग्णालयात जावं (KDMC Hospitals Inconvenience) लागतंय. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रुग्णालयातील असुविधेबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप यश आलेलं नाही. कल्याण डोंबिवली शहराला डॉकटर असलेल्या आयुक्तांसह, लोकप्रतिनिधीची फौज लाभली आहे. तरीही रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे, त्यामुळं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. (Latest Marathi News)
रुग्णालयांत उपचारांची उणीव
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील (KDMC) रुग्णांच्या सेवेसाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालय अशी दोन रुग्णालये सुरु करण्यात आली. या रुग्णालयात नेहमीच तज्ञ डॉक्टराची कमतरता आणि अद्यावत उपचारांची उणीव भासते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी मुंबई कळवा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गरीब-गरजू रुग्णांना उपचार
रुग्णालयांना संजीवनी देण्याचा प्रयत्न कल्याण डोंबिवली महापालिका खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आला. पालिका प्रशासनाकडून रुक्मिणीबाई रुग्णालयात 10 खाटांचे अद्ययावत आयसीयू युनिट तयार करण्यात ( Smart KDMC) आलं. आयसीयू चालविण्यासाठी तज्ञ डॉक्टरची टीम नाही. त्यामुळं या आयसीयुमध्ये गरीब गरजू रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हे आयसीयू चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयसीयू बंद
वर्षभरापूर्वी पहिली निविदा (KDMC) झाली. एका संस्थेने आयसीयु सेंटर चालवण्यास घेतलं. मात्र 10 दिवसात या संस्थेनं माघार घेतली. मे 2023 पासून आयसीयू बंद आहेत. पुन्हा आयसीयू विभागासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली. मात्र अद्याप निविदा प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे आयसीयूला टाळे आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना ठाणे, कळवा, मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये जावं. अन्यथा खिशाला भुर्दंड घालत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतेय.
आयसीयू विभाग लवकर सुरू करणार
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी रुग्णालयातील सुविधांबाबत वाचा फोडली. तसंच सुविधा पुरवल्या नाही, तर आंदोलनाचा इशारा पालिकेला दिलाय. या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर, दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयातील आयसीयू विभाग (KDMC Hospitals ICU Closed) सुरू करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मे 2023 मध्ये आयसीयु विभाग सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर संबंधित संस्थेने माघार घेतल्याने पुन्हा निविदा काढण्यात आली. तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तांत्रिक अडथळे दूर करत लवकरच हा आयसीयू विभाग सुरू करण्यात येईल, असंही अश्विनी पाटील यांनी सांगितलं आहे.
रुग्णालय सुविधांपासून वंचित
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील, मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आमदार विश्वनाथ भोईर, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे आमदार गणपत गायकवाड अशा फायर ब्रँड नेत्यांची फौज आहे. तरीदेखील ककेडीएमसीच्या दोन्ही रुग्णालयांत तज्ञ डॉक्टर, आयसीयू सारख्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळं खंत व्यक्त करण्यात येतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.