Kasba Peth Election Result : कसब्याच्या निकालाआधीच राजकारण तापलं; राष्ट्रवादीचा भाजपवर गंभीर आरोप

एकीकडे मतमोजणीच्या फेऱ्या सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहे.
Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News Latest
Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News LatestSAAM TV
Published On

Kasba Peth Election Result : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजेपासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या ११ फेऱ्या पार पडल्या आहे. अपेक्षेप्रमाणे कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना जवळपास ५ हजारांहून अधिक मताधिक्यांनी पिछाडीवर सोडलं आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News Latest
Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

दरम्यान, एकीकडे मतमोजणीच्या फेऱ्या सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहे. भाजपने कसबा निवडणूकीत पैसे वाटप केले असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणाचा वापर केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा आरोप केला आहे. अजित पवार यांनी सुद्धा याबाबत विधान केलं असून कसब्यात भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आले. आमच्याकडे याबाबतचे व्हिडीओ आहेत. लवकरच आम्ही पुरावे समोर आणू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या या आरोपावर भाजपने देखील उत्तर दिलं आहे. पैसे वाटल्याचे पुरावे आमच्याकडे देखील आहे. आम्ही सुद्धा व्हिडीओ समोर आणू, असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप केल्यानंतर कसबा निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारावर चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News Latest
Political News : भाजपमधील अंतर्गंत वाद चव्हाट्यावर; मंत्र्यासमोरच २ गटात जोरदार शाब्दिक चकमक, Video Viral

कसब्यात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. सातव्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. ही जनतेची आघाडी आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने हे शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले आहेत.

दरम्यान, रुपयांचा पाऊस पाडला. मतपेटीत मतांचा पाऊस पडत आहे. 30 वर्ष जनतेने मला मुलासारखं सांभाळलं. हेमंत रासने यांच्याकडे कमळाचं चिन्ह होतं म्हणून ते निवडून येत होते. चिन्हाशिवाय ते शून्य आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com