Kasba Peth Election Result : कसब्यात भाजपचा पराभव का झाला? ही आहेत ५ मोठी कारणं

महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार मतांनी पराभव केला.
Kasba Peth Election Result
Kasba Peth Election ResultSaam Tv
Published On

Kasba Peth Bypoll Election Result : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. कसब्यात महाविकासआघाडीने ऐतिहासिक विजय मिळवला असून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे कसब्यात भाजपच्या गडाला सुरूंग लागला. (Latest Marathi News)

Kasba Peth Election Result
Kasba Peth Election Result : कसब्यातील भाजपच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...

कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा (BJP) बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे आपण देऊ तो उमेदवार निवडून येईल, अशी शाश्वती भाजपला होती. मात्र, यावेळी परिस्थिती बदललेली दिसली. प्रचार सुरू होताच मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसब्यात तळ ठोकावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर रात्री-अपरात्री मतदारांना भेटत होते. (Maharashtra Political News)

भाजपने या निवडणुकीचा धसका घेतल्याचं शेवटी-शेवटी लक्षात आलं होतं. शेवटी तसंच घडलं. भाजपने पूर्ण ताकद लावूनही कसब्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला. महत्त्वाचं म्हणजे पेठेतल्या मतदारांनी भाजपला नाकारुन धंगेकरांना पाठबळ दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, कसब्यात भाजपचा पराभव का झाला? याची मोठी कारणं समोर आली आहे.

Kasba Peth Election Result
Kasba Peth Election Result: 'शिंदे- फडणवीस सरकार जनतेला अमान्य...' कसब्यातील विजयानंतर अजित पवारांचा हल्लाबोल

कसब्यात भाजपचा पराभव का झाला?

  • कसबा निवडणूकीत भाजपने टिळकांना उमेदवारी नाकारल्याने मतदार नाराज असल्याचं सांगितलं जातं. हे एक भाजपच्या पराभवाचं महत्वाचं कारण सांगितलं जातंय.

  • कसब्याची निवडणूक यावेळी दुरंगी झाली. यापूर्वी कसब्यामध्ये तिरंगी लढती झालेल्या आहेत. या लढतींमुळे कसब्यातल्या मतदारांच्या भरोशावर भाजपला विजय सोपा होत होता.

  • कसबा पोटनिवडणूकीत भाजपने ब्राह्मण समाजाला डावलून हेमंत रासनेंना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसनेही ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवला. आधीच टिळकांमुळे नाराज झालेली ब्राह्मण मतं भाजपपासून आणखीच दुरावली.

  • कसब्यात महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ग्राऊंडवर काम करणारे नेते आहेत. आपला माणूस आणि कामाचा माणूस म्हणून धंगेकरांची ओळख आहे. ते इतके साधे राहतात कसब्यात त्यांना कारमध्ये फिरलेली कुणी बघितलेलं नाही. त्यामुळे मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली.

  • भाजपच्या पराभवाचं पाचवं कारण म्हणजे, कसब्यात मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपला मतदान न करता, थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्याची माहिती आहे.याच पाच कारणांमुळे आज विजयाची माळ रवींद्र धंगेकरांच्या गळ्यात पडलेली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com