Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime News: मुंबईतील उंच इमारतींमध्ये पाईपद्वारे चढून घरात चोरी करून पळ काढणारा स्पायडर मॅन चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Mumbai Spider-Man ThiefSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अशा एका चोरट्याला अटक केली आहे. जो मुंबईतील उंच इमारतींमध्ये पाईपद्वारे चढून घरात चोरी करून पळ काढायचा. स्पायडर मॅन सारख पाईपच्या मदतीने उंच इमारतीत प्रवेश करून घरात चोरी करायचा.

या चोराने मागील पंधरा दिवसात मुंबई उपनगरात अकरा घरात चोरी केल्याचं तपासात उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने कांदिवली पोलिसांनी आरोपी संतोष चौधरी उर्फ वैतू आणि त्याचे दोन साथीदार रजब खान, देव बनिया यांना अटक केली आहे

मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Zika Virus Symptoms VIDEO: झिकाकडे दुर्लक्ष कराल,जीवाला मुकाल? महिलांना सर्वात जास्त धोका? जाणून घ्या लक्षणे

मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी रात्री अकरा ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कांदिवली येथील नमन टॉवरमध्ये राहणाऱ्या निवृत्त बँक अधिकारी अरुण शहा यांच्या घरात चोरी झाल्याबाबतची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी एक टीम तयार करण्यात आली.

तपास पथकाने चोरी झालेल्या इमारतीच्या परिसरातील आणि आवारातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपी चोराची ओळख पटवली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने कांदिवली पोलिसांनी आरोपी संतोष चौधरी उर्फ वैतू आणि त्याचे दोन साथीदार रजब खान, देव बनिया यांना अटक केली आहे.

मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

या आरोपींचा गुन्हे अभिलेख तपासला असता या आरोपींनी दोन आठवड्यात बोरिवली, MHB, कांदिवली आणि गोरेगाव येथे 11 चोरी केल्या आहेत, यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात 8 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. कांदिवली पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या चोरी संदर्भात आणि इतर गुन्ह्यांबाबत अधिकचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com