संजय गडदे, प्रतिनिधी....
Mumbai Crime News: मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नी सोबत मित्राचे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरू 38 वर्षीय व्यक्तीचा त्याच्याच मित्राने लोखंडी हातोडा मारून खून केला. दिनेश प्रजापति (38)असे मृत तरुणाचे नाव असून सुरेश कुमावत वय 26 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
धक्कादायक बाब म्हणजे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने मृताच्या मोबाईल वरूनच आपण आत्महत्या करत असल्याचा एक मेसेज मृताच्या पत्नीला पाठवल्याचेही समोर आले आहे. (Crime News In Marathi)
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, समता नगर (Samata Nagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिलेने आपला पती मिसिंग झाल्याबाबतची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलिसांना वेगळाच संशय आला. या प्रकरणात मिसिंग झालेल्या व्यक्तीचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासा दरम्यान माहितीदाराकडून आरोपी सुरेश कुमार कुमावत याचे विषयी माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला बोलावून चौकशीला सुरुवात केली मात्र त्याने चौकशी दरम्यान पोलिसांना गुंगारा देण्याचाही प्रयत्न केला. शेवटी त्याने दिनेश प्रजापति याची हत्या आपणच केल्याचे कबूल केले. (Latest Marathi News)
आपल्या पत्नीसोबत रुपेश कुमावत याचे प्रेम संबंध असल्याचा संशय होता. यावरून अनेकदा रुपेश आणि दिनेश यांच्यामध्ये भांडणे देखील झाली होती. तीन दिवसांपूर्वी देखील दोघांमध्ये गल्लीत अशीच भांडण झाली असता गल्लीत भांडू नकोस पण घरात जाऊन बोलू असे रुपेशने दिनेशला सांगून घरात नेले तिथे त्यांच्या अधिकच वाद वाढला.
याच दरम्यान रुपेशने दिनेश याची लोखंडी हातोड्याने हत्या केली व मृतदेह गोणीमध्ये भरून काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडबंदर रोड येथील जंगलात खोदलेल्या खड्ड्यात पूरून टाकला असल्याची कबुली रुपेशने पोलिसांना दिली. या प्रकरणात आता कस्तुरबा पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. (Crime News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.