
अभिजीत देशमुख
कल्याण : कल्याणमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमध्ये पोलिसांच्या वाहनातून आरोपी पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा पाठलाग सुरु केला. कल्याण पश्चिममध्ये हा प्रकार घडला आहे. हा आरोपी वाहनातून पळ काढत झाडाझुडपात गायब झाल्याचं बोलले जात आहे. या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरुच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पोलिसांच्या वाहनाचा वेग कमी झाला. त्यानंतर आरोपीने वाहनातून पळ काढल्याची घटना घडली. कल्याण पश्चिम निक्कीनगर चौकात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या आरोपीचा पाठलाग सुरु केला. आरोपी जवळच असलेल्या व्हरटेक्स समोरील मैदानातील झाडाझुडपात गायब झाला.
पोलिसांनी आसपासच्या नागरिकांनी त्या आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी निसटला. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. संजू वाघेरी असे या आरोपीचे नाव आहे. त्याला चोरीच्या प्रकरणात विठ्ठलवाडी अटक करण्यात आली. विठ्ठलवाडी पोलिसांनी त्याला आज कल्याण न्यायालयात हजर केलं होतं.
आधारवाडी कारागृहात नेत असताना निक्कीनगर परिसरात पोलिसांची गाडी हळी झाली, याचा फायदा घेत संजू पळाला. पोलीस आणि नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो पसार झाला. तो जवळच असलेल्या व्हरटेक्सजवळील मैदानातील झाडाझुडपांमध्ये लपल्याचा पोलिसांना संशय आहे. साडे पाच वाजल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करत पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.