
कल्याण-टिटवाळ्यात काळू नदीत दोन सख्या बहिणी बुडाल्या.
रिया अन्सारी (१८) आणि सिना अन्सारी (८) यांचा मृत्यू.
कपडे धुताना पाण्याची पातळी अचानक वाढली.
संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. आतील एक मुलीचे वय ८ वर्ष आहे दुसऱ्या मुलीचे वय १८ वर्ष आहे. ही घटना कल्याण -टिटवाळातील मांडा पश्चिमेतील वासुद्री रोड परिसरातील गणेश नगरमध्ये घडलीय. रिया अन्सारी (वय १८), सिना अन्सारी (८) , अशी दोन्ही मुलींची नावे आहेत. (Heartbreaking Incident in Kalyan 8-Year Old and 18 Year Old Sisters Drown)
या दोन्ही बहिणी गणेश नगर परिसरात राहत होत्या. रिया आणि सिना अन्सारी मंगळवारी दुपारी कपडे धुवण्यासाठी काळू नदीवर गेल्या होत्या. शिवमंदिर येथील नदी काठी त्या कपडे धुवत होत्या. त्यावेळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यात बुडून दोन्ही बहिणींचा मृत्यू झालाय.
कपडे धुत असताना त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. पण त्यांनाही माहिती नव्हतं की त्यांचा हा व्हिडिओ अखेरचा ठरेल. शूट केलेल्या व्हिडिओमध्ये त्या आनंदाने हसत-खेळत होत्या. पण काही वेळात होत्याच नव्हतं झालं. या प्रकरणाची टिटवाळा पोलिसांना माहिती मिळाताच घटनास्थळी धाव घेतली.
एपीआय नलावडे यांनी केडीएमसीच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे सब फायर अधिकारी तडवी यांनी फायर ब्रिगेडचे अधिकारी जयेश मोरे यांच्यासह टीमला घटना स्थळी पाठवलं. अग्निशमन दलाच्या पथकाने दोन तासाच्या प्रयत्नानंतर रिया अन्सारीचा मृतदेह शोधून काढला. तर सिना अन्सारी हिचा मृतदेह अद्याप सापडला नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.