Central Railway : शाब्बास रे पठ्ठ्यांनाे ! लाईनमनच्या सतर्कतेमुळं टळला माेठा रेल्वे अपघात

त्यामुळे लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती.
railway lineman , kalyan , Thakurli
railway lineman , kalyan , Thakurli saam tv

डोंबिवली :  ठाकुर्ली आणि कल्याण जवळील पत्रिपुलाजवळ रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याची घटना आज (मंगळवार) पहाटेच्या सुमार घडली. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या रेल्वे (railway) गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या. दरम्यान लाईनमनच्या सतर्कतेमुळे माेठा अपघात (accident) टळल्याने दाेन्ही लाईनमनचे काैतुक हाेत आहे.

ठाकुर्ली आणि कल्याण जवळील पत्रिपुलाजवळ ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या. लाईनमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला असून त्याने ट्रक फ्रॅक्चर असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती.

railway lineman , kalyan , Thakurli
काॅंग्रेसला मोठा धक्का; महत्वाचे पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल

घटनास्थळी रेल्वेचे तांत्रिक विभागाचे कर्मचारी पाेहचले. त्यांनी ट्रॅकची दुरुस्ती केली. त्यानंतर सकाळी ७.१५ च्या सुमारास वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हळूहळू डाऊन जलद मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली. परंतु सकाळच्या या संकटामुळं प्रवाशांचे हाल झाले. लांबपल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी ताटकळले तसेच कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.

तासभर गाड्यांना विलंब झाल्याने पुढचा सर्व प्रवास तसाच असल्याने अनेकांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरलं. लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्याचा परिणाम लोकल सेवेवरही झालेला पाहायला मिळत आहे. कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला. दरम्यान रेल्वे गाड्या उशीरानं धावणार असल्या तरी लाइनमनसनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. त्यामुळे दोन्ही लाइनमनचेही कौतुक केलं जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

railway lineman , kalyan , Thakurli
सेनेनंतर एनसीपीला लागली गळती; जिल्हाध्यक्षांसह सहा नगरसेवकांची मुख्यमंत्री शिंदेशी हातमिळवणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com