मोठी बातमी! कल्याण शिळ रोड पुढील २० दिवस वाहतूकीस बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Kalyan Shil Road News: कल्याण शिळ रोड मेट्रोच्या कामामुळे २० दिवस बंद राहणार. ११ ते ३१ ऑगस्टदरम्यान वाहतुकीत बदल जाहीर. रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी
Kalyan Shil Road
Kalyan Shil RoadSaam Tv News
Published On
Summary
  • कल्याण शिळ रोड मेट्रोच्या कामामुळे २० दिवस बंद राहणार

  • ११ ते ३१ ऑगस्टदरम्यान वाहतुकीत बदल जाहीर

  • रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी

  • प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असा पोलिसांचा सल्ला

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून मेट्रोचं काम सुरूये. मेट्रोच्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशातच कल्याण शिळ रोडवरून प्रवास करण्यांसाठी एक महत्वाची बातमी. कल्याण शिळ रोड पुढील २० दिवसांसाठी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ११ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात मेट्रोचं काम सुरू आहे. दरम्यान, कल्याण शिळ रोडवर मेट्रो १२ चं गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे. या मेट्रोच्या कामासाठी रस्ता पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत काही विशेष बदल जाहीर केले आहेत.

Kalyan Shil Road
ब्राह्मण समाज म्हणजे पाताळयंत्री.. ठाण्यातील नेत्याला सोडणार नाही.. ठाकरे गटाचे नेते आक्रमक

येत्या ११ ते २० ऑगस्ट कल्याण शिळ रोड बंद असणार आहे. रात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत कल्याणच्या दिशेनं येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड आणि हलक्या वाहनांना प्रवास करण्यास बंदी आहे. या वाहनांना मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक या रस्त्यावर प्रवेश बंदी असेल. तसेच २१ ते ३१ ऑगस्टदरम्यान, रात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत शिळ रोडच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना सुयोग हॉटेल, रिजेन्सी अनंतम चौक येथेही प्रवेश दिला जाणार नाही.

पर्यायी मार्ग कोणते?

मेट्रोची कामे वेळेत पूर्ण आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २० दिवस हा रस्ता बंद असेल. त्यामुळे बाय रोड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. या काळात प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आलंय. दरम्यान, आधीच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या कल्याण आणि डोंबिवलीकरांना, कल्याण शिळ रोड बंद केल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

Kalyan Shil Road
शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी बड्या नेत्याचा राजीनामा

पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केलंय. दरम्यान, या नियमातून पोलीस वाहनं, अग्निशमन दलाच्या गाड्या, रूग्णवाहिका, अशा अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com