Kalyan News: एक्सप्रेसमध्ये रात्रीस खेळ चाले, दबक्या पावलांनी येत झोपलेल्या महिलांच्या..

Mumbai Kalyan Express train theft: धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेच्या पर्समधून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
Kalyan
KalyanSaam Tv News
Published On

मेल एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या महिला प्रवासीच्या पर्समधून मौल्यवान दागिने आणि मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महेश घाग असे चोरट्याचं नाव आहे. याप्रकरणी आरोपीकडून ९ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसेच पोलीस अधिक तपास करीत आहेत.

धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेच्या पर्समधून लाखोंचा ऐवज चोरट्यानं लंपास केलाय. रात्री अपरात्री येणाऱ्या - जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये शिरून चोरटा चोरी करायचा. दागिने, महागडे फोन आरोपी लंपास करायचा. एक्सप्रेसमध्ये चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चोरट्याचा शोध घेण्यासाठी कल्याण लोहमार्ग पोलीस मेल एक्सप्रेसमध्ये गस्त घालत होते.

Kalyan
Pune Swargate: नराधम दत्ता गाडेचं भयानक कृत्य, 'त्या' रात्री आणखी एका महिलेची काढली होती छेड

याच दरम्यान सराईत चोरटा कल्याण रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती कल्याण रेल्वे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. तसेच महेश घाग या सराईत चोरट्याला ताब्यात घेत त्याला बेड्या ठोकल्या.

Kalyan
Pune Crime: पुण्यात चाललंय काय? मामे भावासमोर तरूणीवर सामूहिक बलात्कार, VIDEO काढला; अन् मग..

चौकशी दरम्यान महेशने तीन गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच महेश चोरी केलेले दागिने मुंबई झवेरी बाजार येथील तानाजी माने आणि नितीन येळे या दोन सोनारांना विकत असल्याचं तपासात निष्पन्न झालं.

हे दोघे सोनार चोरीचे दागिने वितळवून विकत होते. पोलिसांनी चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या या दोन्ही सोनारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेल्या दागिन्यांपासून बनवलेल्या सोन्याच्या लगडी, मोबाईल फोन, रोख रक्कम असा ९ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com