Kalyan News : तरुणीची छेड काढल्याने कल्याणमध्ये मोठा राडा; दोन गटात तुंबळ हाणामारी, ५ जणांना अटक

Kalyan Crime News : तरुणीची छेड काढल्याचा आरोप करत दोन गटात भररस्त्यात तुफान राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam TV
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही कल्याण

कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. तरुणीची छेड काढल्याचा आरोप करत दोन गटात भररस्त्यात तुफान राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले. या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Kalyan Crime News
Pune News : लग्नाचे वचन देऊन ३२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने गर्भपातही केला; पुण्यातील घटना

पोलिसांनी (Police) दोन्ही गटातील ५ जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या एक तरुणीशी दोन तरुणांनी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला. जाकिर शेख आणि अरहम सय्यद अशी या तरुणांची नावे आहेत.

या दोघांनी तरुणीला तिचा मोबाइल नंबर देखील मागितला. मात्र, तरुणीने हा संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तरुणीचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी अरहम सय्यद याच्या घरी गेले. या दरम्यान तरुणीचे नातेवाईक आणि तरुणाच्या नातेवाईकांमध्ये जोरदार वाद (Crime) झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रुपांतरण हाणामारीत झाले. याची माहिती टिळकनगर पोलिसाना मिळताच पोलिस तात्काळ घटना स्थळी दाखल झाले. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करणे परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जाकीर शेख, अरहम सय्यद यांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या गटातील तीन जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणीतील अन्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. सध्या परिसरात तणावपूर्व शांतता आहे.

Kalyan Crime News
Shrirampur News : बायकोवरचा राग, तरुणाने थेट मेहुण्याच्या बाळाला संपवलं; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं श्रीरामपूर हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com