कल्याण - गोरगरीब गरजूंच्या पोटाची खळगी भरावी म्हणून आता तृतीयपंथीयांनी पुढाकार घेतला आहे. तृतीय पंथीयांच्या ख्याहिश फाऊंडेशनच्या माध्यमातून अवघ्या एक रुपयांमध्ये नाश्ता व दहा रुपयात जेवण भुकेल्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या गरीब थाली केंद्राचा शुभारंभ ठाणो (Thane) जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदीवासी, गरीब गरजू विधवा माहिला आणि तृयीत पंथीय यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या गरीब थाली शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सूरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाईचे अण्णा रोकडे, आदी मान्यवर उपस्थित होते. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथ दर्शी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
हे देखील पाहा -
या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदीवासी, गरीब गरजू विधवा माहिला आणि तृयीत पंथीय यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून सात तृतीय पंथीय 12 वीची आणि तीन जण बी कॉमची परिक्षा देणार आहेत. किन्नर, गरजू, विधवा आणि आदीवासी निराधारांना आसरा नाही. त्यांच्याकरीता मुरबाड येथे दहा एकर जागा आहे. त्याठिकाणी निवारा उभा करण्याकरीता बांधकाम साहित्याची गरज आहे. ते देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी अध्यक्षा तमन्न मन्सुरी यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी तृतीय पंथीयांचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र देण्याचे काम सुरु आहे. राज्यभरातून ठाणो जिल्ह्यात 782 तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ठाने जिल्हा हा तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात अव्वल ठरला आहे.
आधारकार्ड आणि रेशनिंग कार्ड नोंदणीकराता फाऊंडेशनने सहकार्य केल्यास त्याला सरकारी यंत्रणोला जास्त उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर 65 वर्षीय तृतीय पंथीयांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मानधन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. मुरबाड येथील फाऊंडेशनच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देणार असल्याचे नार्वेकर यांनी आश्वासीत केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.