Kalyan Murbad Railway Line : कल्याण – मुरबाड रेल्वे मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर, थेट अर्थसंकल्पात केली घोषणा

Kalyan Murbad Railway Line update : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. गेल्या वर्षी कल्याण-मुरबाड रेल्वेला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या रेल्वे प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार निम्मा-निम्मा उचलणार आहे.
Kalyan Murbad Railway Line :
Kalyan Murbad Railway Line :Saam tv
Published On

Kalyan Murbad Railway Project :

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. गेल्या वर्षी कल्याण-मुरबाड रेल्वेला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या रेल्वे प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार निम्मा-निम्मा उचलणार आहे. आता या नवीन कल्याण- मुरबाड रेल्वे मार्गाचा सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

ठाणे जिल्ह्यातील २८ किलोमीटर कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाबाबतचं काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावरील जागेचं सर्वेक्षण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने कल्याण-मुरबाड मार्गाला मंजुरी दिली होती. केंद्र सरकारकडून मंजुरी दिल्यानंतर कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर या मार्गासाठी राज्य सरकारने खर्चाचा निम्मा वाटा उचलण्याची हमी घेतली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Murbad Railway Line :
Maharashtra Budget 2024 Announcement: ठाण्यातील अंबरनाथसह ११ जिल्ह्यांत मेडिकल कॉलेज, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

हजार कोटींपेक्षा कमी किंमतीचा प्रकल्‍प?

कल्याण- मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण किंमत ८५७ कोटी रुपये खर्च लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती. त्यानंतर आता या कल्याण- मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरु होणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात दिली.

Kalyan Murbad Railway Line :
Manoj Jarange Patil regret : मनोज जरांगे यांनी व्यक्त केली दिलगिरी; देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले होते अपशब्द

असा असणार मार्ग...

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गावरील नियोजित स्थानके कोणती?

कल्याण

शहाड

आंबिवली

कांबा रोड

आपटी

मामनोली

पोटगाव

मुरबाड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com