Kalyan News: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी

Kalyan Neighbour Dispute: कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वी एका मराठी कुटुंबीयांना शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने बेदम मारहाण केली होती. या घटनेमध्ये दोन जण जखमी झाले होते.
Kalyan News: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी
Kalyan Neighbour DisputeSaam
Published On

कल्याणमध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणातील आरोपींची रवानगी पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली आहे. मारहाण प्रकरणात अटक असलेल्या चारही आरोपींना आज कल्याणच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यासर्व आरोपींना कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वी एका मराठी कुटुंबीयांना शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने बेदम मारहाण केली होती. या घटनेमध्ये दोन जण जखमी झाले होते. मराठी माणूस भिकारी असल्याचे भैय्यांनी हिनवलं त्यामुळे हा वाद झाला.

कल्याण पश्चिमेच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबियांना मारहाण करण्यात आली होती. देशमुख यांच्या शेजारी राहणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी आपल्या काही मित्रांसोबत देशमुख यांच्यावर हल्ला केला होता. देशमुख कुटुंबीयांतील दोन भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Kalyan News: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी
Kayan Crime News: गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लांबवला; तीन तासांनी दुसरी चोरी करताना चोरटा गजाआड

या मारहाणप्रकरणी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला सह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली होती. अटकेनंतर आज आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात आणखी आरोपी असून त्यांना अटक करणे बाकी आहे, आरोपीकडून मारहाण वेळी शस्त्र रिकव्हरी बाकी आहे, असे पोलिसांनी कोर्टात सांगितले. पोलिसांनी अधिक तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी मागितली. आरोपींवर कट रचणे, गाडीला पिवळी बत्ती वापरणे हे कलम वाढवण्यात आले आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी
Mahesh Gaikwad: टायगर इज बॅक, भावी आमदार.. महेश गायकवाड यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी

कल्याणमध्ये झालेल्या या घटनेचा संपूर्ण राज्यभरातून निषेध केला जात आहे. या घटनेवरून राजकारण देखील तापले आहे. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अखिलेश शुक्ला याला निलंबित केले असल्याची माहिती शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. मराठी माणसांवर दादागिरी करणाऱ्या माजोरड्यांचा माज उतरवणार असल्याचा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. या घटनेचा तपास सध्या खडकपाडा पोलिसांकडून सुरू आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी
Kalyan News : आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने चोरी; लोकलमधून मोबाईल व चैन लांबवताच सापडला पोलिसांच्या ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com