Kalyan : कल्याणमध्ये खळबळ! लॉजमध्ये जखमी अवस्थेत आढळले बहीण-भाऊ; कारण अत्यंत चिंताजनक, पोलीसही हादरले

Kalyan crime News : कल्याणमधील महाराष्ट्र लॉजमध्ये राहणाऱ्या भाऊ-बहिणीने कथित आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे
Crime
CrimeSaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे | साम टीव्ही न्यूज | कल्याण प्रतिनिधी

Kalyan latest news crime News : कल्याण शहरात आज एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन परिसरातील 'महाराष्ट्र लॉज'मध्ये वास्तव्यास असलेल्या भाऊ-बहिणीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५६ वर्षाचा भाऊ आणि ५३ वर्षांच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. हे दोघेही मूळचे आसनगाव येथील रहिवासी असून काही कामा निमित्त कल्याणमध्ये आले होते. गेल्या काही काळापासून दोघेही बेरोजगार होते. कोणताच कामधंदा मिळत नसल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Crime
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने महागाई भत्ता वाढवला, ३२ सरकारी कंपन्यांचा पगार इतका वाढणार

घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही तातडीने ताब्यात घेऊन उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी व पोलिसांनी दिली आहे.

Crime
Rain Alert : शुक्रवारी कोणत्या जिल्ह्याला पावसाचा इशारा? IMD ने ५ दिवसांचा अंदाज सांगितला; विकेंडला पाऊस कोसळणार का?

दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागे केवळ बेरोजगारी हेच कारण आहे की आणखी काही कौटुंबिक किंवा आर्थिक अडचण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

महत्त्वाची टीप : आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा पर्याय नाही. मानसिक तणाव, नैराश्य किंवा कोणत्याही कठीण प्रसंगातून जात असेल, तर कृपया एकाकी वाटू देऊ नका. मदत उपलब्ध आहे. हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून समुपदेशकांची मदत घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com