Kalyan : दुर्गाडी देवी मंदिरात हिंदूंना प्रवेश बंदी, शिवसेनेचे आंदोलन, दोन आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Shiv Sena's 35-year protest at Durgadi Fort explained : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील दुर्गाडी देवी मंदिरात हिंदूंना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना गेली ३५ वर्षे घंटानाद आंदोलन करत आहे. आज सकाळपासून शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं.
Durgadi Devi Kalyan Shiv Sena Protest News
Shiv Sena workers protest at Durgadi Fort in Kalyan over Hindu entry ban on Bakri Eid; leaders detained by police. Saam TV News
Published On

Durgadi Devi Kalyan Shiv Sena Protest News : बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज अदा करतात, यादरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी आहे. गेल्या 35 वर्षांपासून शिवसेना ही प्रवेश बंदी हटवण्यासाठी घंटानाद आंदोलन करत आहे. आज सकाळपासून दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि राजेश मोरे यांनी समर्थकांसह तीव्र आंदोलन केले.

दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आमदार राजेश मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेलं हे आंदोलन मागील ३५ वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे दोन्ही गटाकडून हे आंदोलन सुरू आहे.

Durgadi Devi Kalyan Shiv Sena Protest News
Eknath Shinde : जळगावमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, नेमकं काय घडलं?

आज बकरी निमित्त सकाळी शिवसेनेचे दोन्ही गट तसेच हिंदू हिंदुत्ववादी संघटनाकडून दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ला जवळ तसेच लालचौकी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बकरी ईद निमित्त दुर्गाडी जिल्हा परिसरात मुस्लिम बांधवांना नमाज अदा करत असतात, त्या पार्श्वभूमीवर किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी असते, हे मंदिर बंद असते.

Durgadi Devi Kalyan Shiv Sena Protest News
Pune Bus Fire : पुणे हिंजवडी जळीतकांड प्रकरणाला वेगळं वळण, मी तर चालकाला..; कंपनी मालकाचा मोठा खुलासा

गेल्या 35 वर्षापासून दुर्गाडी किल्ला परिसरातील मंदिर सुरू करण्यासाठी शिवसेनेकडून घंटानात आंदोलन केले जात आहे. गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून हे आंदोलन सुरू आहे. आज देखील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात लालचौकी परिसरात हे आंदोलन करत आहेत. मोठ्या प्रमाणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी बॅरिगेट ओलांडून येण्याचा प्रयत्न केला. बकरी ईद निमित्त शिवसेना शिंदे गटाचे दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

लाल चौकी परिसरात पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवले. शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली. सत्तेत असलो तरी आंदोलन करणार, असे आमदार भोईर यांनी सांगितले. त्यांचे नमाज सुरू असताना मंदिर खुलच ठेवण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली. दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आमदार राजेश मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com