कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिेवशी शहरात मोठी बंडखोरी

kalyan dombivli politics : कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात मोठी बंडखोरी पाहायला मिळाली.
BJP Politics
bjp NewsSaam tv
Published On
Summary

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपला धक्का

जागावाटपात चार जागा शिंदे गटाला दिल्याने नाराजी

कल्याणमधील बंडखोरी समोर

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक ६ मधून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या जागावाटपात संपूर्ण पॅनलमधील चारही जागा शिंदे गटाला देण्यात आल्याने मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पालिका हद्दीतील थेट बंडखोरी उघडपणे समोर आली आहे.

भाजपमध्ये तब्बल २० वर्षे निष्ठेने काम करूनही पक्षाने दखल घेतली नाही, असा आरोप करत भाजमंडळ उपाध्यक्ष सुधीर वायले यांनी नाराजी जाहीर केली आहे. त्यांच्या नाराजीला इतर कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनल क्रमांक ६ मधून चारही भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सुधीर वायले, सचिन यादवाडे, तृप्ती भोईर आणि नीता देसले यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP Politics
झटपट पटापट! फोन येताच भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भरला उमेदवारीचा अर्ज? पुण्यातील यादी आली समोर

स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जमीनीवर काम करणाऱ्या, संघटन वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील राजकीय समीकरणांनुसार निर्णय घेण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संयम सुटला असून हा लढा स्वाभिमानाचा असल्याचे बंडखोर उमेदवार सांगत आहेत.

BJP Politics
आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण? संपूर्ण पुण्यात जोरदार चर्चा

तत्पूर्वी, या बंडखोरीचा थेट परिणाम पॅनल क्रमांक ६ मधील महायुतीच्या गणितावर होण्याची शक्यता असून भाजप शिंदे गटातील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा उघड झाला आहे. पुढील काळात पक्षाचे वरिष्ठ नेते या बंडखोरीवर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com