

डोंबिवली - पुण्यात काल मेट्रो उद्घाटन झाले. याच धर्तीवर कल्याण-डोंबिवलीकरांसाठी मेट्रो कधी येणार असा सवाल उपस्थित सवाल नागरिक करू लागले आहेत.कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांसाठी मेट्रोची (Metro) सेवा उपलब्ध होणार अशी घोषणा करून आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. तसेच मेट्रो वरून शिवसेना-भाजप (BJP) मध्ये श्रेयवाद आणि बॅनरबाजी सुद्धा झाली. यावरूनच मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी यांना लक्ष करत सांगितले की, कल्याण-डोंबिवलीकरांना मेट्रो अजून 15 वर्षे दिसणार नाही. दरम्यान शिवसेना डोंबिवली युवती शहर अधिकारी प्राजक्ता देशपांडे यांच्यासह शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला आहे. मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्या उपस्थितीत त्यांनी मनसेत (MNS) प्रवेश केला आहे.
हे देखील पहा -
काय म्हणाले मनसेचे आमदार...
आपल्याकडे घोषणाच होते, आपल्याकडे कुठलाच प्रकल्प येत नाही. मागे सांगत होते ऐरोली टनेल कटाई पर्यंत येतो मी लिहून देतो अजून १० वर्षे तरी येणार नाही. फक्त घोषणा होत आहेत. रस्त्यांवरचे ट्राफिक कसे कमी होईल त्याच्याकडे लक्ष दिले जात नाहीत. पब्लिक ट्रान्सपोर्टची सुधारणा होत नाहीत. मेट्रो सुद्धा डोंबिवलीकरांना अजून पंधरा वर्षे दिसणार नाही. हे फक्त थापा मारतायत नेहमी प्रमाणे, यांना वाटलं लोक विसरले. मी परत परत सांगतो घोषणा चेक करा त्याच्या सोशल मीडियाचे पेज चेक करा, त्याच त्याच घोषणा गेले सात आठ वर्षांपूर्वी झालेल्या दिसतील. मग ती कोणतेही निवडणूक असो लोकसभेची असो विधानसभेची असो किंवा नगरपालिकेची असो त्याच त्याच घोषणा होतात म्हणून लोक बळी पडतात असे देखील मनसेचे आमदार म्हणाले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.