

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी...
Mumbai Kalyan Crime: मुंबई कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईकडे येणाऱ्या पंजाब मेल एक्सप्रेस ट्रेनवर दरोडा टाकण्यात आला असून प्रवाशांना मारहाण करत लुट केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या पंजाबमेल एक्सप्रेस (Panjab Mel Express) ही ट्रेन भुसावळ आऊट यार्डवर थांबली होती. ही संधी साधत तीन जण एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांनी डब्यातील काही प्रवाशाना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी दमदाटी करत सात प्रवाशांकडून मोबाईल आणि रोकड हिसकावून घेत तेथून पळ काढला.
या घटनेमुळे प्रवासी घाबरले होते. नाशिक रेल्वे स्थानक गेल्यानंतर त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना ही घटना सांगितली. या प्रकरणात कल्याण (Kalyan) रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहित कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
या तक्रारीनुसार पोलिसांनी तीन अज्ञात दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटना भुसावळ रेल्वे यार्डमध्ये घडल्याने हा गुन्हा भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.