Kalyan Crime News: कल्याणमधून २४ वर्षांची महिला पोलीस बेपत्ता, पोलिसांना वेगळाच संशय

Kalyan Lady Police Constable Missing: याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये (Bazar Peth Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Bazarpeth Police Station
Bazarpeth Police Station Saam Tv

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan News: नवी मुंबईत (Navi Mumbai) कार्यरत असलेली आणि कल्याणमध्ये (Kalyan) राहणारी एक महिला पोलिस कर्मचारी बेपत्ता (Lady Police Constable Missing) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला पोलीस गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये (Bajarpeth Police Station) याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या महिला पोलिसाचा शोध घेत आहेत.

Bazarpeth Police Station
Raj Thackeray News: भरसभेत राज ठाकरेंनी केली अजित पवारांची नक्कल; खड्ड्यावरून भाजपवरही साधला निशाणा

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणारी २४ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाली. घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. ही महिला पोलीस कर्मचारी नवी मुंबईतील पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. ती गेल्या काही दिवसांपासून कामावर देखील गैरहजर आहे.

Bazarpeth Police Station
Gondia 3 Teachers Drown : धरणात बुडून ३ शिक्षकांचा मृत्यू; गोंदियातील हृदयद्रावक घटना

१५ ऑगस्टनिमित्तच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला देखील ही महिला पोलीस कर्मचारी गैरहजर होती. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून या महिला पोलिसाचा शोध सुरु आहे. याच दरम्यान पोलिसांकडे आणखीन एक महिती समोर आली आहे. नवी मुंबईतील एका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दोन दिवसांपासून कामावर आलेला नाही. बेपत्ता महिला पोलीस आणि कामावर गैरहजर असलेला पोलीस कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.

Bazarpeth Police Station
Raj Thackrey Speech : चांद्रयान 3 चंद्रावर पाठवलं, आपल्याला काय उपयोग?, खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी काढली खरडपट्टी

ही महिला पोलीस कर्मचारी एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत निघून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जोपर्यंत महिला पोलीस कर्मचारी सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा खुलासा होणार नाही. दोघांकडून अद्याप कोणताही संपर्क केला गेला नसल्याने दोघांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. पोलीस सर्व अंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. बेपत्ता महिला पोलीस कर्मचारी लवकरात लवकर सापडली पाहिजे यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com